Health Tips: सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा 'हे' योगासन; त्वरित मिळेल आराम
Locust Pose: तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही शलभासन करु शकता. हे आसन करायचं कसं? आणि याचे अन्य फायदे काय? जाणून घेऊया.
Health Tips: धकाधकीच्या जीवनामुळे आणि सततच्या कामामुळे अनेकांना पाठदुखीचा (Back Pain) त्रास जडतो. अनेक उपाय केल्यानंतरही काही परिणाम दिसून येत नाही किंवा तात्पुरता आराम मिळतो. पण योगासनं (Yoga) यावर चांगला उपाय ठरु शकतात. तर योगासनांमधील असंच एक आसन जे पाठदुखीवर उपाय ठरतं आणि ते म्हणजे "शलभासन".
शलभासन (Shalabhasana) याला कधीकधी 'टोळ पोझ' म्हणूनही संबोधलं जातं, ही एक योग स्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही पोटावर झोपता आणि एकाच वेळी तुमचे हात, पाय आणि धड जमिनीपासून वर करता. प्रत्येकजण ज्याला योगासनांची मूलभूत माहिती आहे ते हे आसन आरामात करु शकतात. ज्यांना योगासनं माहित नाही, ते हळूहळू या आसनाचा सराव करु शकतात. तर प्रथम या योगासनाचे फायदे पाहूया आणि नंतर ते कसं करायचं याबद्दल माहिती घेऊया.
शलभासनाचे फायदे
- शलभासन तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करतं.
- शलभासन केल्यामुळे पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते, पाठदुखी दूर होते.
- या आसनामुळे हाडं मजबूत होतात.
- शलभासन केल्यामुळे पचन सुधारते, ओटीपोटात दाब पडल्याने पचन चांगलं होतं आणि बद्धकोष्ठता दूर होते.
- ज्यांना चिंता (Anxiety) किंवा नैराश्याचा (Depression) सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी शलभासन हे एक उत्तम आसन आहे. कारण ते छाती आणि उदर हळूवारपणे ताणतं, ज्यामुळे तणाव आणि चिंता दूर होते.
शलभासन नेमकं कसं करायचं?
- प्रथम तुम्ही सामान्यपणे जसं पोटोवर झोपता, त्याच पद्धतीने झोपा.
- तुमचे हात तुमच्या समोर पसरवा.
- तुमचे पाय तुमच्या मागे सरळ ठेवा आणि त्यांना एकत्र ठेवा.
- आता दीर्घ श्वास घ्या आणि त्याच वेळी तुमचे हात, छाती आणि पाय जमिनीपासून वर उचला.
- नजर समोर ठेवून काही सेकंदांसाठी तीच स्थिती धरा.
- आता एक श्वास घेऊन तुमचे हात, पाय आणि छाती परत जमिनीवर आणून होते त्या स्थिती सोडा.
- हीच प्रक्रिया काही काळासाठी वारंवार करा.
- आपले हात, पाय आणि छाती जमिनीवर परत आणताना आणि पोझ सोडताना श्वास सोडा.
- हात, पाय आणि छाती वर करताना मोठा श्वास घ्या.
- तुमची मान दुखू नये म्हणून, तुमची नजर पुढे ठेवा.
शलभासनाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. या आसनाचा वारंवार सराव केल्याने पचनशक्ती सुधारेल, तणाव आणि चिंता कमी होईल, पाठदुखी कमी होईल, पाय टोन होतील आणि प्रजनन प्रणाली उत्तेजित होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा:
Raisin Benefits: मनुके खाण्याचे 'हे' आहेत 10 जबरदस्त फायदे; अशक्तपणा देखील राहील दूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )