एक्स्प्लोर

Fertility : मोठी बातमी! वंध्यत्वावर लवकरच प्रभावी उपचार सापडणार, मेंदूतील एका विशेष पेशीच्या शोधामुळे आशा बळावली

Fertility Treatment : शास्त्रज्ञांनी मेंदूतील एका विशिष्ट पेशीचा शोध लावला आहे, ज्याचा संबंध मूल होण्याशी असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत एक अहवाल जारी करण्यात आला आहे.

Brain Cell Discovery : जगभरातील शास्त्रज्ञांकडून विविध रोगांवर संशोधन सुरु आहे. जगभरातील वैज्ञानिक वेगवेगळ्या आजारांवर संशोधन करुन उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जपानमधील शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी मेंदूतील एका विशिष्ट पेशीचा शोध लावला आहे, ज्याचा संबंध मूल होण्याशी असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे वंध्यत्वावर लवकरच प्रभावी उपचार सापडण्याचा आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

वंध्यत्वावर लवकरच प्रभावी उपचार सापडणार

जपानी शास्त्रज्ञांनाना संशोधनात मेंदूतील किस्पेप्टिन नावाचे न्यूरॉन्स सापडले आहे. या किस्पेप्टिन नावाच्या पेशी महिलांच्या अंडाशयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या संप्रेरकाच्या निर्मितीवर प्रभाव टाकतात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यापैकी एक कार्य म्हणजे अंड्यांचा विकास आणि ओव्ह्यूलेशन (Ovulation) करणे. बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याच्या क्रियेला ओव्ह्यूलेशन (Ovulation) म्हणतात.

मेंदूतील एका विशेष पेशीच्या शोध

या संशोधनाचा अहवाल जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना प्राणी आणि मानवांमधील पुनरुत्पादक रोग समजून घेण्यास आणि त्यावर उपचार करण्यात मदत होऊ शकते. किस्पेप्टिन न्यूरॉन्स मेंदूतील GnRH आणि LH सारख्या हार्मोन्सचे उत्पादन नियंत्रित करतात. हे संप्रेरक अंडाशयांना अंडी आणि स्त्रीबिजांचा विकास यासारख्या गोष्टी करण्यासाठी सिग्नल देण्याचं महत्वाचं कार्य पार करतात.

या प्रक्रियेत मेंदूचे दोन मुख्य भाग 

1. आर्क्युएट न्यूक्लियस (ARC) : येथील किस्पेप्टिन न्यूरॉन्स GnRH आणि LH चे नियमित स्तर राखतात, ज्यामुळे सामान्य अंड्यांचा विकास आणि संप्रेरक निर्मिती होते.

2. अँटेरोव्हेंट्रल पेरिव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस (एव्हीपीव्ही) : येथे किस्पेप्टिन न्यूरॉन्स GnRH आणि LH चे स्तर वाढवतात, ज्यामुळे ओव्हुलेशन होते.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ARC मधील किस्पेप्टिन न्यूरॉन्स डायनॉर्फिन या प्रतिबंधात्मक पदार्थाची निर्मिती करतात आणि त्याला प्रतिसाद देतात.

संशोधनात काय समोर आलं? वाचा सविस्तर

"एआरसीमधील (ARC) किसपेप्टिन न्यूरॉन्स डायनॉर्फिन आणि त्याचे रिसेप्टर्स दोन्ही तयार करतात, तर एव्हीपीव्हीमध्ये (AVPV) फक्त रिसेप्टर्स असतात. यामुळे डायनॉर्फिन असलेले किस्पेप्टिन न्यूरॉन्स गर्भधारणेमध्ये विशिष्ट भूमिका बजावतात", असं नागोया विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल फेलो मयुको नागे यांनी सांगितलं आहे. जपान आणि सहयोगी प्राध्यापक योशिहिसा उएनोयामा यांनी पुढे सांगितलं की, "पण डायनॉर्फिन आणि त्याचे रिसेप्टर किसपेप्टिन न्यूरॉन्सचे नियमन नेमक्या कशाप्रकारे करतात हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही."

याची तपासणी करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतील उंदरांचा आनुवंशिक कोड बदलला ज्यामुळे डायनॉर्फिन रिसेप्टर असलेल्या किसपेप्टिन न्यूरॉनमध्ये Kiss1 जनुक नसेल. हे जनुक किस्पेप्टिन बनवण्याचे काम करते. या संशोधनात त्यांना आढळलं की, ज्या उंदरांमध्ये Kiss1 जनुक हटवण्यात आले होते, त्यांच्या ARC मध्ये फक्त 3 kisspeptin चे न्यूरॉन्स शिल्लक होते आणि AVPV मध्ये 50 टक्क्यांची घट झाली होती. या उंदरांना अजूनही मुलं होऊ शकतात, पण त्यांच्याकडे गर्भधारणेचे चक्र मोठं होतं, अंडाशयाचं वजन कमी होतं आणि मुलं की कमी होतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget