Mental Health : मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहणं बायकोपेक्षा बॉसच्या हातात, संशोधनातून बाब उघड
Mental Health : मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहणं बायकोपेक्षा बॉसच्या हातात असल्याचं समोर आलं आहे. मानसिक आरोग्यावर बायकोपेक्षा बॉसचा जास्त परिणाम होतं असल्याचं संशोधनात उघड झालं आहे.
Mental Health Study : सध्याच्या धकाधकी जीवनात (Busy Lifestyle) आणि स्पर्धेच्या जगात शारीरिक आरोग्य (Physical Health) त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य (Mental Health) जपणं आर महत्त्वाचं आहे. अनेक जण ताणतणावाचा सामना करत आहे. यामुळे मानसिक समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहणं बायकोपेक्षा बॉसच्या हातात असल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. मानसिक आरोग्यावरील परिणाम तपासण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण आणि व्यवस्थापकांची भूमिका तसेच वैयक्तिक आरोग्यातील बाबींचं निरीक्षण करण्यात आलं. यानुसार समोर आलं आहे की, मानसिक आरोग्यावर बायकोपेक्षा बॉसचा जास्त परिणाम होतं असल्याचं संशोधनात उघड झालं आहे.
कामाचा मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम
सध्याच्या आधुनिक पिढीतील कर्मचारी मानसिक आरोग्य जपण्याला अधिक महत्त्व देत मानसिक आरोग्य जपण्याची बाब केंद्रस्थानी ठेवतात. यासाठी व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच कामावरील वातावरण आणि व्यवस्थापकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते आहे. एका नव्या अहवालानुसार, जगभरातील 60 टक्के कर्मचार्यांना वाटते की, त्यांची नोकरी ही त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे. सर्वेक्षणात बहुसंख्य लोकांनी सांगितलं की ते उच्च पगाराच्या नोकरीपेक्षा मानसिक आरोग्य संतुलित राखण्याला अधिक प्राधान्य देतील आणि कमी वेतनावर काम करतील.
मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहणं बायकोपेक्षा बॉसच्या हातात
या अहवालामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, मॅनेजर अर्थात बॉसचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या जोडीदारासारखाच प्रभाव असतो. व्यक्तीच्या आयुष्यावर बॉस आणि पत्नी दोन्हींचा प्रभाव 69 टक्के असतो. तर त्यांच्या डॉक्टरचा 51 टक्के किंवा थेरपिस्टचा 41 टक्के प्रभाव असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याच्या जोडीदारपेक्षा बॉसचा जास्त परिणाम होतो, अहवालात उघड झालं आहे.
'40 टक्के लोक कामाच्या तणावामुळे नोकरी सोडतील'
तसेच या अहवाला आणखी एक मोठी बाबही समोर आली आहे. या रिपोर्टनुसार पुढील 12 महिन्यात म्हणजेच वर्षभरात सुमारे 40 टक्के लोक कामासंबंधित ताणतणावामुळे नोकरी सोडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
10 देशांतील कर्मचाऱ्यांवरील संशोधनावर अहवाल
यूकेजी येथील द वर्कफोर्स इन्स्टिट्यूटने (The Workforce Institute, UKG) या महिन्याच्या सुरुवातीला 'मेंटल हेल्थ ॲट वर्क : मॅनेजर्स अँड मनी' हा अहवाल ('Mental Health at Work : Managers and Money' report) प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये कामाचा आणि मानसिक आरोग्याचा संबंध, कामाची व्यक्तीच्या आयुष्यातील विविध भूमिका आणि त्याचा मानसिक आरोग्यावरील परिणाम याबाबत रिसर्च करण्यात आला. 10 देशांतील कर्मचाऱ्यांवर हे संशोधन करण्यात आलं, त्यानुसार हा अहवाल जारी करण्यात आला आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )