Food While Sitting on Floor : आई सारखी सांगते खाली बसून मांडी घालून जेव; पण का? काय फायदे होतात?
तुमच्या आजी-आजोबांनीही तुम्हाला कधी ना कधी खाली जमिनीवर बसून नीट मांडी घालून जेवायला लावलं असेलच. त्यावेळी तुमच्या मनात प्रश्न आला असेलच की, असं का? जमिनीवर बसून जेवल्यानं असा काय फरक पडणार आहे?
Food While Sitting on Floor : जेवण, अन्न ग्रहण करण्याच्या क्रियेला जेवण करणं म्हणतात. याच जेवणावर आपल्या आरोग्याचा (Health Tips) समतोल अवलंबून असतो. पण तुम्हाला माहितीय का? आपण जेवणात कोणत्या पदार्थांचं सेवन करतो, यासोबतच आपण कसं बसून जेवतो, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सध्या आपल्या देशात पाश्चात्य संस्कृतीचा खूप प्रभाव पाहायला मिळतो. हल्ली सर्रास सगळेच रात्रीचं जेवण (Diner), दुपारचं जेवण (Lunch) आणि नाश्ता (Breakfast) डायनिंग टेबलवर किंवा टेलिव्हिजनच्या समोर सोफ्टावर बसून करतात. पण तुम्हाला आठवत असेल तर, जेवण जमिनीवर (Healthy Diet) बसूनच जेवावं, असा थोरामोठ्यांचा नेहमीच आग्रह असायचा. तुमच्या आजी-आजोबांनीही तुम्हाला कधी ना कधी खाली जमिनीवर बसून नीट मांडी घालून जेवायला लावलं असेलच. त्यावेळी तुमच्या मनात प्रश्न आला असेलच की, असं का? जमिनीवर बसून जेवल्यानं असा काय फरक पडणार आहे?
पूर्वीच्या काळी टेबल आणि खुर्च्या अस्तित्वात येण्यापूर्वी लोक जमिनीवर बसून जेवायचे. आशियातील अनेक भागांमध्ये आणि विशेषत: भारतामध्ये, ही एक सामान्य प्रथा आहे. सोफ्यावर किंवा डायनिंग टेबलवर आरामात बसून खाणं चांगलं आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जमिनीवर बसून जेवण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. जमिनीवर बसून जेवल्यानं शरीराचं अनेक आजारांपासून रक्षण होतं.
जमिनीवर मांडी घालून बसून जेवण्याचे फायदे काय?
पचनक्रिया सुधारते
जमिनीवर मांडी घालून बसल्यानं (सुखासन) आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही तुमचं जेवणाचं ताट जमिनीवर ठेवता आणि जेवताना थोडं खाली वाकून घास खाता आणि मूळ स्थितीत परत येता, यामुळे पोटाचे स्नायू सक्रिय होतात. असं खाल्यानं आम्ल स्त्राव वाढतो आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते.
लठ्ठपणा कमी होतो
जर तुम्हाला तुमचं वाढलेलं पोट कमी करायचं असेल, तर नियमितपणे तुम्हा हा पॅटर्न फॉलो केला पाहिजे. अशी स्थिती तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी प्रभावी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यासोबतच थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठीही मदत होते.
हृदयाचं आरोग्य सुधारतं
सुखासनात जेवल्यानं आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. मांडी घालून खाल्ल्यानं तुमचा तणाव दूर होतो. तसेच, यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रियाही सुलभ होते.
स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम
इतर सर्व योगासनांप्रमाणे सुखासनात बसल्यानं तुमची मुद्रा सुधारते. यामुळे स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. यामुळे तुम्हाला लवचिकता मिळते, तुमची पाठ सरळ ठेवतं आणि तुमच्या पायांना ताकद देते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )