![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Covid Infection: सावधान! दुसऱ्यांदाही लगेच होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, जाणून घ्या कसं?
Covid Infection: चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभर थैमान घातलंय. सामन्य नागरिकांपासून तर, राजकीय, क्रिडा, अभिनयासह विविध क्षेत्रातील लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचं आपण पाहिलं आहे.
![Covid Infection: सावधान! दुसऱ्यांदाही लगेच होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, जाणून घ्या कसं? Be careful! A second corona infection can occur immediately, know how? Covid Infection: सावधान! दुसऱ्यांदाही लगेच होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, जाणून घ्या कसं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/03af7945fe7399e1904564ad029ac007_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Covid Infection: चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभर थैमान घातलंय. सामन्य नागरिकांपासून तर, राजकीय, क्रिडा, अभिनयासह विविध क्षेत्रातील लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचं आपण पाहिलंय. यातच कोरोना संसर्गाबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर त्याला दुसऱ्यांदा संसर्ग होण्यास वेळ लागतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर बाधितांच्या शरिरात अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतात. परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेच कोरोनाची लागण होऊ शकतो.
एम्सचे टीकाकरण प्रभारी डॉ. संजय रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनआधी दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होता. भारतात 2020 मध्ये नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ लागला. तेव्हा धारावीसारखे अनेक झोपडपट्टी भागातून दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर येत होते. मात्र, अशा ठिकाणीही आता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात थांबला आहे. कोरोनाचे आतापर्यंतचे सर्व प्रकार अतिशय धोकादायक होते, जे एकदा झाले की त्याच्याशी दीर्घकाळ लढण्याची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते. पण ओमायक्रॉन सामान्य सर्दी फ्लू सारखा आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये अशा परिस्थितीत ते शरीरात अँटीबॉडीज तयार करू शकत नाही, ज्यामुळे एखाद्याला दुसऱ्यांदाही कोरोनाची संसर्ग होऊ शकतो."
नैसर्गिक प्रतिकारशक्ती अधिक प्रभावी
डॉक्टर संजय राय यांनी सांगितले की, "मानवी शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी उत्तम काम करते. नैसर्गिक प्रतिकारशक्ती कोरोना प्रतिबंध लसीपेक्षा 2700 पट अधिक प्रभावी आहे. यामुळं कोरोनापासून वाचविण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती महत्वाची भूमिका बजावते. जरी कोरोना प्रतिबंध लस मानवी शरिरात प्रतिकारशक्ती तयार करते आणि संक्रमणाची तीव्रता कमी करतात. परंतु, तरीही दोन्ही विषाणूंना शरिरात प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाहीत. विषाणू शरिरात गेल्यानंतर त्याच्याशी लढण्यासाठी ते प्रभावी ठरते."
प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार
पहिली म्हणजे ह्युमरल इम्युनिटी, ही इम्युनिटी शरीरातील अँटीबॉडीज शोधते आणि दुसरी सेल्युलर इम्युनिटी आहे. ज्यामध्ये इम्युनिटी मेमरी बनवते. तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज संपली तरी ही प्रतिकारशक्ती व्हायरसशी लढण्यास मदत करते.
हे देखील वाचा-
- Health Care Tips : सर्दीसोबतच कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग, आहारात ‘हे’ सुपरफूड नक्की सामील करा!
- CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)