Health Tips : महिलांनो, या 10 लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; कर्करोगाचा वाढू शकतो धोका
Cancer In Women : आपल्यापैकी बहुतेकजण कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण ही तुमची मोठी चूक ठरू शकते.
Cancer In Women : आजच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या मग्न असतात की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळच मिळत नाही. अशातच त्यांना अनेक आजारांनी घेरलं जातं. बर्याच वेळा कर्करोगासारखे गंभीर आजार काही लक्षणांवरूनच सुरू होतात. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या शरीरात होणार्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. आपल्यापैकी बहुतेकजण कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण ही तुमची मोठी चूक ठरू शकते. या ठिकाणी आम्ही काही 10 लक्षणं सांगितली आहेत ज्याकडे महिलांनी कधीच दुर्लक्ष करू नये.
1. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे : अनेक वेळा आपल्याला असे वाटते की, मासिक पाळीशी संबंधित समस्या किरकोळ आहेत. पण, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्यासारख्या काही समस्यांना हलक्यात घेऊ नये. एंडोमेट्रियल कर्करोग असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक स्त्रियांना, म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, अनियमित मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दरम्यान किंवा नंतर वारंवार योनीतून रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. वजन कमी होणे : कोणताही आहार किंवा व्यायाम न करता तुमचे वजन अचानक कमी झाले तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. हे कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक आहे.
3. योनीतून स्त्राव होणे : जर स्त्रीला सतत रक्तरंजित किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव होत असेल तर हे कधीकधी एक मोठी समस्या दर्शवू शकते. हे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, योनिमार्गाचा कर्करोग किंवा एंडोमेट्रियल कर्करोगाचे लक्षण असू शकते.
4. सतत थकल्यासारखे वाटणे : व्यस्त जीवनात कोणालाही थकवा जाणवू शकतो. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये, थोडी विश्रांती घेतल्याने तुमचा थकवा दूर झाला पाहिजे. पण जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे एखाद्या गंभीर समस्येचे म्हणजे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
5. कधीही भूक न लागणे : तुम्हाला जर भूक लागत नसेल तर हेदेखील कर्करोगाचे लक्षण असू शकते.
6. पोटदुखी : जर एखाद्या महिलेला पोटदुखी, गॅस, अपचन, फुगणे किंवा पोटात जळजळ होणे यांसारख्या समस्या दीर्घकाळ होत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भाशयाच्या किंवा एंडोमेट्रियल कर्करोगाची ही लक्षणे असू शकतात.
7. वारंवार लघवी होणे : जर एखाद्या महिलेला कोणत्याही कारणाशिवाय सतत लघवी करण्याची गरज भासू लागली तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
8. उलट्या किंवा अपचन होणे : जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. . गर्भाशय. तो संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो.
9. शौचास त्रास होणे : जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र, हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो.
10. स्तनातील बदल : स्तनाग्रांमध्ये काही बदल दिसत असल्यास, याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनाच्या कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )