Health Tips : खोकल्यामुळे प्रकृती बिघडली? वेळीच या 3 घरगुती उपायांचा वापर करा
Home Remedies For Cough : बदलत्या ऋतूमध्ये खोकला वाढू नये यासाठी हे तीन सर्वात सोपे आणि स्वस्त मार्ग आहेत, जे व्हायरल आणि सर्दीपासून देखील संरक्षण करतात.

Home Remedies For Cough : सध्या हवामानात बदल झाला असून दिवसा उन्हाचा तडाखा दिसू लागला आहे. पण राज्यातील काही भागांत सकाळ आणि संध्याकाळ अजूनही थंड असते. त्यामुळे दिवसभरात सततच्या बदलत्या हवामानामुळे या दिवसांत सर्दी, खोकला, तापाचे रुग्णांची संख्या वाढलीय. या मोसमी आजारांमुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून घट्ट कपडे घाला आणि जर तुम्हाला तुमच्या घशात किंवा खोकल्यामध्ये काही अस्वस्थता जाणवत असेल तर या तीनपैकी कोणताही एक उपाय करून पाहू शकता.
विशेष म्हणजे तुम्हाला कफ आणि घसा दुखणे, सर्दी इत्यादींचा त्रास होत असेल, तरीही तुम्ही या तीनपैकी कोणत्याही उपायांचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होईल आणि असे फक्त 2 ते 3 वेळा केल्याने तुम्हाला आराम दिसू लागेल.
खारट पाण्याच्या गुळण्या करा
कफ टाळण्याचा आणि कफ वाढवणारे बॅक्टेरिया लगेच मारून टाकण्याचा यापेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि दिवसातून किमान दोन ते तीन वेळा गुळण्या करा. यामुळे कफ वाढणे देखील थांबेल आणि पूर्णपणे बरा होईल. कोणत्याही प्रकारचा संसर्ग घशातही पसरणार नाही.
आल्याचं पाणी प्या
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि ते बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे देखील आहेत. म्हणूनच खोकला बरा करण्यासाठी ते विशेषतः दोन प्रकारे कार्य करते. सगळ्यात आधी घसा आणि फुफ्फुसात सूज येऊ देत नाही. कफ निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकते आणि शरीरात जमा झालेले जुने कफ काढून टाकते. यामुळे कफची समस्याही दूर होते.
बेटाडाइन पाण्याने गुळण्या करा
बेटाडाइन पाण्याने गुळण्या केल्याने कफ निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घशातील वेदना, सूज आणि जळजळ यांपासून आराम मिळतो. दिवसातून किमान दोनदा मिठाच्या पाण्याने आणि बीटाडीनने गुळण्या कराव्यात. तुमच्या घशाच्या स्थितीनुसार तुम्ही तीन ते चार वेळा गुळण्या करू शकता. खोकला सुरू होताच या तीनपैकी कोणताही एक उपाय करावा.
असे केल्याने कफची समस्या वाढत नाही आणि तुमच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत नाही. कफच्या सुरुवातीला हे तीन उपाय केल्याने तुम्हाला औषधं आणि कफ सिरप वगैरेची गरज भासणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
