Health Tips : 'या' आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी चुकूनही केळी खाऊ नये; अन्यथा जीव धोक्यात येईल
Health Tips : केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. अनेकजण उपवासाला किंवा सकाळच्या नाश्त्यात केळ्याचं सेवन करतात.
Health Tips : केळ (Banana) हे असं एक फळ आहे जे तुम्ही खाण्यातही वापरू शकता तसेच निरोगी आरोग्यासाठी (Health Tips) देखील केळ्यांचा वापर केला जातो. केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. अनेकजण उपवासाला किंवा सकाळच्या नाश्त्यात केळ्याचं सेवन करतात. मात्र, केळ्याचं योग्य वेळी सेवन केलं तरच त्याचे चांगले परिणाम मिळतात. चुकीच्या वेळी जर तुम्ही केळी खाल्लीत तर त्याचा साईड इफेक्टही लगेच होतो. केळी जास्त खाल्ल्याने पोट बिघडते. त्यामुळे विचार करूनच केळी खावी. कारण ते तुमच्या पोटातील पाणी शोषून घेते. आणि चयापचय गती कमी करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार भासू शकते. कधी कधी केळी खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या लोकांनी केळी खाऊ नये? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
कोणत्या आजारात केळी खाऊ नये
हाय ब्लड शुगरचा त्रास असल्यास केळी खाऊ नयेत
केळी खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णाला हानी पोहोचू शकते, त्याच वेळी, यामुळे तुमची साखरेची पातळी वाढू शकते. केळी खाल्ल्याने मधुमेहाचा वेग वाढू शकतो. आणि मधुमेहाची समस्या असू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी केळी खाणे टाळावे.
दमा आणि ब्राँकायटिस मध्ये केळ्यांचं सेवन करू नये
केळी खाल्ल्याने अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस सारख्या समस्या उद्भवू शकतात. केळीमुळे तुमची अॅलर्जी आणखी वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला दमा आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास होत असेल तर केळी न खाण्याचा प्रयत्न करा.
खोकला असल्यास केळी खाऊ नयेत
खोकल्यादरम्यान केळी खाल्ल्याने समस्या वाढू शकते. केळी श्लेष्मा वाढवते ज्यामुळे रक्तसंचय होण्याची समस्या उद्भवते. यासोबतच अॅलर्जी आणि श्वासोच्छवासाचा त्रासही होतो. खोकल्याचा त्रास असलेल्यांनी चुकूनही केळी खाऊ नये. कारण काही लोकांसाठी संध्याकाळी केळी खाल्ल्याने खोकला वाढतो.
मायग्रेनमध्ये केळी खाऊ नयेत
केळ्यात हिस्टामाईन असते. जर त्यात अशी काही संयुगे वाढली तर ती तुमची मायग्रेनची समस्या वाढवू शकते. तसेच, केळीमध्ये टायरोसिन अमीनो अॅसिड असते जे शरीरात पोहोचल्यानंतर टायरामाइनमध्ये बदलते. अशा स्थितीत मायग्रेनचा त्रास होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :