Health Tips : तुम्हीसुद्धा दिवसाची सुरुवात उकडलेल्या अंड्यांनी करताय? वाचा याचे आश्चर्यकारक फायदे
Health Tips : अंड्यात व्हिटॅमिन ए, डी, बी12, रिबोफ्लेविन आणि सेलेनियम यांसारखे अनेक जीवनसत्त्व असतात.
Health Tips : निरोगी आणि हेल्दी जीवनशैलीसाठी (Lifestyle) अंडी (Eggs) खूप महत्त्वाची आहेत. कारण अंड्यात अनेक पोषक घटक असतात. अंड्यात व्हिटॅमिन ए, डी, बी12, रिबोफ्लेविन आणि सेलेनियम यांसारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा हा एक चांगला स्रोत आहे.
यामध्ये असलेले पोषक घटक हाडांच्या आरोग्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अंड्याचा वापर आपण अनेक प्रकारे करतो. जसे की, काहींना उकडलेली अंडी खायला आवडतात तर काहींना ऑम्लेट बनवून खायला आवडते, तर काहींना भाजी, बुर्जीच्या स्वरूपात अंडी खायला आवडतात. जर तुम्हालाही उकडलेली अंडी खायला आवडत असतील तर जाणून घेऊयात याचे काही फायदे.
डोळ्यांसाठी फायदेशीर
उकडलेल्या अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात असलेली ही संयुगे वाढत्या वयाबरोबर डोळ्यांशी संबंधित समस्या जसे मोतीबिंदू इत्यादींचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय उकडलेल्या अंड्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यासाठी उपयोगी आहे.
हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त
अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये कॉलेस्ट्रॉल आढळत असले तरी, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अंडी कमी प्रमाणात खाल्ल्याने बहुतेक लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यामध्ये असलेले उच्च प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड सारखे पोषक हृदय निरोगी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढेच नाही तर आठवड्यातून सात उकडलेली अंडी खाल्ल्याने काही प्रकारचे स्ट्रोक टाळता येते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
वजन नियंत्रित करण्यास फायदेशीर
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उकडलेली अंडी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. उकडलेली अंडी खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
केस आणि त्वचेसाठी चांगले
उकडलेल्या अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि विविध जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी बनण्यास मदत होते. यामध्ये असलेले बायोटिन मजबूत आणि निरोगी केस राखण्यासाठी तसेच त्वचेचा पोत आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले पोटॅशियम त्वचेला मुरुम, डाग आणि टॅनिंगपासून मुक्त होण्यास मदत करते.
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अंड्यांमध्ये कोलीन नावाचे एक आवश्यक पोषक तत्व असते, जे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीच्या विकासासाठी महत्वाचे आहे. अंड्यातील पिवळे बलक पोषणाचा एक चांगला स्रोत आहे, जो मेंदूच्या पेशी आणि स्मृती-संबंधित कार्यांमधील संवाद वाढवण्यास मदत करतो.