(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सकाळी लवकर उठल्यानंतर 'हे' 5 सकाळचे स्ट्रेचिंग व्यायाम करा; नेहमी निरोगी राहाल
Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी जिमला जाणं आवश्यक नाही. सकाळी उठल्यानंतरही तुम्ही तुमच्या पलंगावर काही स्ट्रेचिंग व्यायाम करून तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Health Tips : वाढत्या वयानुसार शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर उठून काही व्यायाम (Excercise) केले तर संपूर्ण दिवस उत्साही राहतो. आज आम्ही तुमच्यासाठी असेच 5 सकाळचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज घेऊन आलो आहोत. जे फॉलो करून तुम्ही तुमच्या फिटनेसची (Fitness Tips) देखील काळजी घेऊ शकता. हे व्यायाम कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
हाफ स्प्लिट ट्विस्ट
यामध्ये, तुमचे पाय सरळ केल्यानंतर, तुम्हाला नितंब मागे खेचावे लागतील. या व्यायामामध्ये छाती जमिनीच्या दिशेने ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळी, तुम्हाला तुमचा डावा हात जमिनीवर ठेवावा लागेल आणि उजवा हात उजवीकडे छताच्या दिशेने हलवावा लागेल.
बेसिक ट्विस्ट
या व्यायामासाठी तुम्हाला तुमचा मागचा पाय सरळ करावा लागेल. आता डावा हात तुमच्या उजव्या पायाच्या डाव्या बाजूला जमिनीवर ठेवावा लागेल. श्वास सोडताना उजवा हात वरच्या दिशेने घेऊन उजवीकडे वळा.
नी-टू-चेस्ट स्ट्रेच
हा व्यायाम अंथरुणावर करण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपावे लागेल. यानंतर गुडघे एकत्र आणून छातीजवळ घ्यावे. आता दोन्ही हातांनी पाय पकडून छातीकडे ओढा. या दरम्यान, तुम्हाला दीर्घ श्वास घ्यावा लागेल.
स्ट्रेट लेग लंज
तुमच्या मागच्या पायाची बोटे आणि तुमचे पाय सरळ करा आणि तुमचे नितंब पुढे करा. आता तुमची छाती जमिनीच्या दिशेने वाकवा आणि तुमचे हात पायांसमोर ठेवा.
स्पाईन ट्विस्ट
या व्यायामामध्ये तुम्हाला दोन्ही गुडघे एकत्र आणून शरीराच्या उजव्या बाजूला हलवावे लागतील. यानंतर उजव्या हाताने गुडघ्यांना खालून आधार द्या आणि मान डावीकडे हलवा आणि या स्थितीत 5-7 वेळा दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला तोच क्रम दुसऱ्या बाजूलाही पुन्हा करावा लागेल.
सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही हे 5 व्यायाम केले तर यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील. तसेच, आजारही दूर राहतील. फक्त व्यायामा बरोबरच निरोगी व्यायाम करणं देखील शरीरासाठी फार गरजेचं आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :