Health Tips : रोज दही खाणं आरोग्यासाठी हानिकारक? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ
Health Tips : दह्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक घटक सहज मिळतात.

Health Tips : दही (Curd) हे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले आरोग्यदायी अन्न आहे. बरेच लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक तत्व दही खाल्ल्याने पूर्ण होतात. पण रोज दही खाणे योग्य आहे की त्याचे काही तोटे होऊ शकतात. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे शरीर निरोगी असेल आणि तुम्ही मर्यादित प्रमाणात दही खात असाल तर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. पण, जर तुम्ही रात्री दही खाल्ले आणि त्यामुळे कफ तयार होत असेल तर डॉक्टर खाण्यास नकार करू शकतात. अशा परिस्थितीत रोज दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात? या संदर्भात जाणून घ्या.
दह्यापासून प्रथिने मिळतात
शरीराच्या पेशींना वाढण्यासाठी अमिनो आम्लांची आवश्यकता असते, जी प्रथिनांपासून मिळते. स्नायू, त्वचा, केस, नखे हे सर्व प्रोटीनपासून बनलेले असतात. अशा परिस्थितीत शरीराला दररोज प्रथिनांचा पुरवठा करायचा असेल तर दही हा उत्तम पर्याय आहे. USDA नुसार, 100 ग्रॅम दही खाल्ल्याने 11.1 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात.
प्रोबायोटिक्स
आतड्यांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात, जे पचन आणि पोषणासाठी मदत करतात. त्यांची संख्या राखण्यासाठी दही उपयुक्त आहे. दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, पोटातील उष्णता यांसारख्या समस्या दूर होतात.
कॅल्शियम
आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे लहान आणि कमकुवत होतात. अशा परिस्थितीत दही खाल्ल्याने कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते.
व्हिटॅमिन बी 12
व्हिटॅमिन बी 12 शरीरातील नसा, मेंदू आणि रक्तासाठी आवश्यक आहे. हे जीवनसत्व फार कमी पदार्थांमध्ये आढळते. आजकाल लोकांमध्ये त्याची कमतरता अधिक दिसून येत आहे. दही हे दुधापासून बनवले जात असल्याने त्यापासून थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळते.
ऊर्जा मिळते
खूप थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर दही खावे. दही खाल्ल्याने ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो आणि थकवा दूर होतो. दररोज मर्यादित प्रमाणात दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी दह्याचं सेवन करावं पण मर्यादित प्रमाणात करावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
