एक्स्प्लोर

Health Tips : मधुमेहामुळेही केस गळतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न आहे? 'हे' आहे खरं कारण

Diabetes And Hair Fall : मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेची वाढ, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्ताभिसरणातील समस्या यामुळे केस गळू शकतात.

Diabetes And Hair Fall : मधुमेहामुळे (Diabetes) जीवनशैलीशी (Lifestyle) संबंधित अनेक समस्या उद्भवतात. आहारात बदल, वाढणारं प्रदूषण आणि बिघडती जीवनशैली  त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही होतो. परिणामी केस गळू लागतात. मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेची वाढ, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्ताभिसरणातील समस्या यामुळे केस गळू शकतात. जर्नल ऑफ हेअर अँड स्कॅल्प हेल्थनुसार, दररोज 50 ते 100 केस गळणे सामान्य असू शकते. तणाव किंवा गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे जास्त केस गळू शकतात. हे सामान्य कारणांमुळे देखील होऊ शकते परंतु रक्तातील साखर कमी झाल्यामुळेदेखील केस गळू शकतात. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

मधुमेहामुळे केस गळतात का?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते केस गळणे हे टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळे अलोपेसिया देखील होऊ शकतो, ज्यामध्ये डोक्यावरील केस पूर्णपणे बाहेर पडतात. त्यामुळे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींबाबत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

मधुमेहामध्ये केस गळण्याची कारणे

1. रोगप्रतिकारक प्रणाली विकार

टाईप 1 मधुमेहामध्ये स्वयं-प्रतिकार विकार विकसित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एलोपेशिया एरियाटा होण्याचा धोका असू शकतो. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या कूपांवर हल्ला करू शकते. त्यामुळे टाळू आणि शरीराच्या इतर भागांवर केस गळायला लागतात.

2. हायपरग्लेसेमिया 

हायपरग्लायसेमिया म्हणजेच उच्च रक्तातील साखर हे इन्सुलिनची कमतरता, इन्सुलिन प्रतिरोधकता किंवा दोन्हीमुळे होऊ शकते. यामध्ये मायक्रोव्हस्क्युलर आणि मॅक्रोव्हस्क्युलर म्हणजेच लहान-मोठ्या वाहिन्या हळूहळू खराब होतात. यामुळे पायातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि गुडघ्याखालील केसांचे फॉलिकल्स देखील खराब होऊ शकतात. हे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह रोखण्याचे काम करते, ज्यामुळे केस गळू शकतात.

3. हार्मोनल असंतुलन

थायरॉईडचे विकार मधुमेहामुळे होतात. थायरॉईड संप्रेरकांच्या पातळीत अडथळा आल्याने केसांवरही परिणाम होतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी देखील जास्त असू शकते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि अतिरिक्त कॉर्टिसॉल केसांच्या कूपांना नुकसान पोहोचवू शकते आणि केस गळू शकतात.

मधुमेहामध्ये केस गळणे कसे टाळावे?

1. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करून केस गळती टाळता येते.
2. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घेतल्यास केस गळती टाळता येते.
3. योग आणि व्यायामामुळे केस गळती टाळता येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget