एक्स्प्लोर

Health Tips : शिजवलेल्या भाज्या की कच्च्या भाज्या? कोणत्या भाज्या खाणं जास्त फायदेशीर; वाचा संपूर्ण माहिती

Health Tips : बहुतेक भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. मात्र, काही भाज्या आहेत, ज्या सलाड म्हणून वापरल्या जातात.

Cooked Vegetables VS Uncooked Vegetables : शरीरातील पौष्टिकतेची कमतरता दूर करण्यासाठी भाज्या हा सर्वात आरोग्यदायी पर्याय मानला जातो. मात्र, भाज्या कच्च्या खाल्‍याने जास्त फायदा होतो की शिजवून खाल्‍याने हा मुद्दा नेहमीच चर्चेचा असतो. बहुतेक भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. तसेच, काही भाज्या देखील आहेत, ज्या सलाड म्हणून वापरल्या जातात, म्हणजेच कच्च्या खाल्ल्या जातात. काहींच्या मते, भाज्या शिजवणे हा त्यातील पोषक तत्वे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर काहींच्या मते कच्च्या भाज्या खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

बर्‍याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कच्च्या खाण्यापेक्षा शिजवलेल्या भाज्या खाल्ल्याने आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण वाढते. एवढेच नाही तर भाज्यांची चवही पूर्वीपेक्षा चांगली होते. भाजी शिजवण्यासाठी वाफवणे आणि तळणे हे उत्तम पर्याय असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, काही अभ्यासातून असे देखील दिसते की,  आपल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळे भाज्यांच्या पौष्टिक घटकांवर परिणाम होऊ शकतो. संशोधकांना असे आढळून आले की ब्रोकोली तळणे, मायक्रोवेव्हिंग करणे आणि उकळणे यामुळे क्लोरोफिल, विद्राव्य प्रथिने, साखर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होऊ शकते. ब्रोकोली वाफवताना असे परिणाम दिसून येत नाहीत.

'या' भाज्या शिजल्यानंतर पौष्टिक होतात

1. पालक

पालेभाज्या पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही भाजी शिजवून खाल्ल्यास जास्त कॅल्शियम आणि लोह मिळू शकते. कारण पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते, जे लोह आणि कॅल्शियमचे शोषण रोखते. पण शिजवल्यानंतर भाजीतून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळू शकतात.  

2. टोमॅटो

बॅस्टिर युनिव्हर्सिटीच्या पोषण आणि व्यायाम विज्ञान विभागाच्या मते, टोमॅटो शिजवून खाल्ल्यास त्यातून व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. 2002 मध्ये जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की शिजवलेल्या टोमॅटोमध्ये कच्च्या टोमॅटोपेक्षा लाइकोपीनची पातळी लक्षणीयरीत्या जास्त असते. 

3. मशरूम

मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. कच्च्या मशरूमपेक्षा शिजवलेल्या मशरूममध्ये पोटॅशियम, नियासिन आणि झिंकचे प्रमाण जास्त असते.

4. गाजर

गाजरमध्ये कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. हाडांच्या वाढीस मदत करण्यात, दृष्टी वाढविण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget