Banana Benefits : कच्ची केळी खा अन् वजन कमी करा! कच्ची केळी खाण्याचे भरपूर फायदे
Banana Benefits : दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित आहेत. मात्र अनेकांना कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे कदाचित माहित नसावं.
Banana Benefits : केळी (Banana) हे असे फळ आहे, जे खायला खूप चवदार आणि गोड असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केळी खूप आवडतात. रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदेही होतात. दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित आहेत. मात्र अनेकांना कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे कदाचित माहित नसावं. कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.
कच्ची केळी खाण्याचे फायदे
1) वजन घटवण्यास मदत- वजन घटवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरिरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते.
2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती- कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.
3) भूख नियंत्रित - कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपण वळत नाही.
4) मधुमेहावर नियंत्रण - मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
5) पचनक्रिया सुधारते - कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या तेलामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )