Hair Health: 'हे काय वय आहे का माझे केस पांढरे होण्याचं?' 12 ते 32 वयात 'या' कारणांमुळे केस पांढरे होतात, उपाय तर वाचा...
Hair Health: आजकाल 12 ते 32 वर्षे वयोगटातील लोकांना केस पांढरे होण्याची समस्या भेडसावू लागली आहे. केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात.
Hair Health : आपल्या केसांमुळे (Hair Tips) आपल्या सौंदर्यात भर पडत असते, तसं वयाच्या 40 वर्षांनंतर केस पांढरे होणे हे सामान्य आहे. कारण माणसाचे वय जसजसे वय वाढते तसतसे त्याचे केस पांढरे होऊ लागतात, परंतु आजकाल अनेकांना लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या भेडसावू लागली आहे. चक्क चाळीशीच्या आधी म्हणजेच वयोवर्ष 12 ते 32 वयात केस पांढरे होऊ लागतात, काय कारणं आहेत यामागची आणि यावर उपाय जाणून घ्या
केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे आहेत
आजकाल 12 ते 32 वर्षे वयोगटातील लोकांना केस पांढरे होण्याची समस्या भेडसावू लागली आहे. बऱ्याच वेळेस, हे अनुवांशिक देखील असू शकते, परंतु काहीवेळा हे शरीरातील अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील असू शकते. जेव्हा केसांच्या आतील भागात पेशींद्वारे पुरेसे मेलेनिन तयार होत नाही, तेव्हा केस पांढरे होतात. यामागे अनेक कारणे आहेत. ज्यात तणाव, हार्मोनल बदल किंवा त्वचारोग देखील समाविष्ट आहे. केस अकाली पांढरे होण्याची कोणती कारणे आहेत? हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
जीवनसत्त्वांची कमतरता
केसांच्या वाढीबरोबरच त्यांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पोषणाचीही गरज असते. जर आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर केस पांढरे होऊ लागतात. व्हिटॅमिन बी 12, लोह, तांबे आणि जस्त यासारखी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात. हे पोषक द्रव्ये मेलेनिनची निर्मिती आणि केसांचा आतील भाग निरोगी ठेवण्यास मदत करतात.
हार्मोनल बदल
विशेषत: गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान शरीरातील हार्मोनल बदल केसांच्या रंगावर परिणाम करू शकतात. मेलानोसाइट-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एमएसएच) आणि कोर्टिसोल यांसारख्या हार्मोन्समधील चढ-उतार आणि असंतुलन यामुळे राखाडी केसांची समस्या वाढवू शकते.
अतिविचार, चिंता
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन्सचा स्राव होतो, ज्यामुळे केसांच्या रंगासह शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत किंवा जास्त तणावामुळे मेलेनोसाइट्सची कमतरता होते, ज्यामुळे केस पांढरे होतात.
धूम्रपान
धूम्रपान विविध आरोग्य समस्यांशी निगडीत आहे. हे अनेक रोगांचे कारण आहे आणि त्यापैकी एक म्हणजे पांढरे केस. त्यामुळे शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स वाढतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Child Health : तू चाल पुढं...! मुलांना भावनिकदृष्ट्या 'असे' मजबूत करा की, त्यांना आयुष्यात कधीही कसलीच भीती वाटणार नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )