(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिरवे टोमॅटो खाल्ल्याने आरोग्यास मिळतात अनेक फायदे, प्रतिकारशक्तीही वाढते
Health Tips : हिरवा टोमॅटो पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. याचे प्रमाण प्रमाणात सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
Green Tamato Health Benefits : टोमॅटो हा असा खाद्यपदार्थ आहे जो कोणत्याही पदार्थाची चव वाढवतो. टोमॅटो सॅलाड म्हणूनही खाल्ले जाते. टोमॅटोची चटणी, सूप किंवा ज्यूस इ. इतर अनेक प्रकारे लोक याचे सेवन करतात. बहुतेक लोक लाल टोमॅटोला त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. परंतु तुम्ही हिरव्या टोमॅटोचे नाव ऐकले आहे का? हिरव्या टोमॅटोमध्येही भरपूर पोषक गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाचे घटक आढळतात. हिरव्या टोमॅटोचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हिरव्या टोमॅटोचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवता येते :
बिघडत्या जीवनशैलीमुळे आजकाल बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. यासाठी आपण अनेक औषधेही घेतात. अशा वेळी हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते -
कोविड-19 च्या युगात रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व काय आहे हे आपल्या सर्वांना कळले आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्याला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुम्ही हिरव्या टोमॅटोची मदत घेऊ शकता. हिरव्या टोमॅटोने शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.
डोळ्यांचे आरोग्य -
हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. बीटा कॅरोटीनने डोळे निरोगी ठेवण्यासोबतच त्यांचा प्रकाशही वाढवता येतो. यासाठी तुम्ही रोज हिरव्या टोमॅटोचे सेवन करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Health Benefits Of Kiwi : रोज किवी खा, विटामिन सीची कमतरता दूर करा
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )