(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : उशीखाली लसणाची पाकळी ठेवा; आश्चर्यकारक फायदे मिळतील
Health Tips : जर तुम्हाला रात्री चांगली झोप लागली तर पुढचा दिवस छान जातो. कारण शरीरात ऊर्जा भरलेली असते आणि मेंदू एकदम फ्रेश वाटतो. गाढ झोपेसाठी ही एक सोपी युक्ती आहे.
Health Tips : दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी रात्रीची झोप पूर्ण होणे आणि अखंड झोप असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रात्री चांगली झोप घेतल्याने पुढचा संपूर्ण दिवस चांगला जातो. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करणे सोपे जाते तसेच दिवसभर ताजेतवाने राहतो. परंतु, अनेक अनेक विचारांनी रात्री झोप येत नाही किंवा पूर्ण होत नाही. अशा वेळी झोपण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या तुमच्या चांगल्या झोपेसाठी नक्कीच फायदेशीर आहेत. या लसणाच्या पाकळ्या वापरायच्या कशा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लसूण वापरण्याची पद्धत
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवा. ही पाकळी मोठ्या आकाराची असावी आणि ती सोलून न काढता उशीखाली ठेवावी. लसणाची पाकळी सालीसकट ठेवल्यास तिखट वासही येणार नाही तसेच तुमची उशी खराबही होणार नाही.
अशी ही पद्धत कार्य करते
लसणाचा एक अतिशय गोड वास तुमच्या उशीतून तुमच्यापर्यंत पोहोचेल. जो तुम्हाला क्वचितच जाणवेल. या वासामुळे शांतता जाणवेल. तसेच तुमचा मेंदू तणावमुक्त करण्यासाठी काम करेल. यामुळे तुमची झोप मोड होणार नाही. तसेच लवकर झोपही लागेल.
लसणाच्या पाकळीत नेमके काय आहे?
हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की लसणात असे काय आहे, जे झोप येण्यासाठी इतके प्रभावीपणे काम करते. यावर अजून संशोधन सुरु आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हणता येईल की, लसूणमध्ये आढळणारे सल्फर आणि लसणाचा वास या दोन्हींचा हा मिश्र परिणाम आहे. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी आजच ही पद्धत वापरून पहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :