(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak : बाप्पाचं स्वागत करा चॉकलेट मोदकाने; जाणून घ्या कृती...
Chocolate Modak : गणपती आणि मोदकाचं अतुट नातं आहे. गणपतीला मोदक खायला आवडतो. त्यामुळे गणेशोत्सवात वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले जातात.
Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak Recipe : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवा (Ganeshotsav 2022) दरम्यान दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा प्रसाद बनवला जातो. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा जर तुम्ही प्रसादासाठी विचार करत असाल तर जाणून घ्या चॉकलेट मोदकाची रेसिपी...
चॉकलेट मोदकासाठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट - 250 ग्राम
खवलेला नारळ - 100 ग्राम
बदाम - 7-8 बदाम
काजू - 5-6 काजू
पिस्ता - 4-5 पिस्ता
कंडेंस्ड दूध - 50 ग्राम
तूप - 1 चमचा
चॉकलेट मोदकाची कृती
- चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी डार्क चॉकलेट तूपामध्ये वितळून घ्यावे. चॉकलेट वितळण्यासाठी तव्यावर पाणी टाकून त्यावर एक ताट ठेऊन चॉकलेट वितळावे.
- त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ एकत्र करावा.
- काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळात कंडेंस्ड दूध टाकून छान मिश्रण तयार करून घ्यावे.
- मिश्रणात चॉकलेट टाकून ते थंड होण्यास ठेवावे.
- त्यानंतर ते मिश्रण मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवावेत.
बाप्पाचं आगमन यंदा कधी होणार?
यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.
संबंधित बातम्या