Friendship Day 2024 : ....तर असा सुरू झाला फ्रेंडशिप डे! ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात? महत्त्व जाणून घ्या
Friendship Day 2024 : जो तुमच्या दु:खात मदतीला येतो, तोच खरा मित्र... फ्रेंडशिप डे साजरा करायला कोणी सुरुवात केली? मैत्रीचाही एक दिवस असावा हे कोणाच्या मनात आलं? जाणून घ्या..
Friendship Day 2024 : तेरे जैसा यार कहा...दोस्तो की दुनियादारी मे हसीन मेरी जिंदगी... ही दोस्ती तुटायची नाय.. मैत्रीवर अनेक गाणींचा ठेवा आहे. जी आपल्याला मैत्रीचं महत्त्व पटवून देतात. सर्वप्रथम सर्वांना आजच्या मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. ती इंग्रजीतील म्हण माहित असेलच तुम्हाला, A Friend in need is a friend indeed...जो दु:खाच्या वेळी मदतीला येतो तोच खरा मित्र. एक असा मित्र किंवा मैत्रीण, ज्याच्यासोबत आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी बिनधास्तपणे बोलू शकतो. खरा मित्र आपल्या मित्राच्या हिताचाच विचार 24 तास करत असतो. तुम्हाला माहीत आहे का? फ्रेंडशिप डे साजरा करायला कोणी सुरुवात केली? मैत्रीचाही एक दिवस असावा हे कोणाच्या मनात आलं?
भारतासह विविध देशात फ्रेंडशिप डे कधी साजरा होतो?
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का फ्रेंडशिप डे साजरा करायला कोणी सुरुवात केली? प्रत्येकजण आपापल्या मित्रमंडळींसोबत हा मैत्री दिन साजरी करतो. भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर युनायटेड स्टेट्समध्ये 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा केला जातो. 1998 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासभेने 2011 साली ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. फ्रेंडशिप डे साजरा केल्याने लोक, देश, संस्कृती आणि विविध लोकांमध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होण्यास मदत होईल. फ्रेंडशिप डे एका सेतूप्रमाणे काम करेल. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन अधिकृतपणे 30 जुलै रोजी साजरा केला जातो. पण अनेक देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्याचे ठरवले जाते. अमेरिका आणि भारतासारख्या देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
फ्रेंडशिप डे साजरा करायला कोणी सुरुवात केली?
फ्रेंडशिप डेची कल्पना सर्वप्रथम जॉयस हॉलने 1958 मध्ये दिली होती. जॉयस हॉल हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक होते, जे मैत्रीच्या नात्याबद्दल प्रेरित होते. त्यांच्या मनात कल्पना आली की, मित्रांनी आपली मैत्री आणि प्रेम शेअर तर केलेच पाहीजे, सोबत हा दिवस साजरा देखील करावा. मिस्टर हॉलची ही कल्पना लोकांना खूप आवडली, त्यानंतर हळूहळू लोक फ्रेंडशिप डे साजरा करू लागले. ज्यानंतर जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होऊ लागला.
फ्रेंडशिप डे चे महत्त्व काय?
मैत्री ही कोणत्याही वयापुरती मर्यादित नसते. कोणत्याही वयात, जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत बसून बिनधास्त बोलू शकतो, मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो, आपले विचार मांडू शकतो, खरी मैत्री इथेच असते जेव्हा समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल याचा विचार केला जात नाही. मैत्रीमध्ये, लोक एकमेकांना जसे आहेत तसे स्वीकारतात, ते ही कोणत्याही अटीशिवाय...
हेही वाचा>>>
Friendship Day : फ्रेंडशिप डे 'गेट-टूगेदर' खास! मित्रमंडळींसमोर 'या' झटपट डिश सर्व्ह करा, पाहताच प्रेमात पडतील..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )