Food : अक्षय्य तृतीयेचा प्रसाद खास! काहीतरी वेगळं करायचंय? 'मोहनथाळ' बनवा, देवतांचा आशीर्वाद लाभेल
Food : तुम्हाला प्रसादात काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त आम्ही दिलेल्या रेसिपीचे पालन करावे लागेल
Food : अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. शास्त्रात अक्षय्य तृतीयेला स्वयंभू शुभ मुहूर्त मानले गेले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न, गृहनिर्माण, व्यवसाय किंवा उद्योग यासारख्या शुभ कार्याची सुरुवात करणे खूप शुभ आणि फलदायी असते. खऱ्या अर्थाने अक्षय्य तृतीया नावाप्रमाणेच शुभ फळ प्रदान करते. अक्षय्य तृतीयेला सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत राहतात. तसेच या दिवशी खास प्रसाद बनवून तो देवतांना अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. तुम्हाला प्रसादात काहीतरी वेगळे करून पहायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त आम्ही दिलेल्या रेसिपी फॉलो करावी लागेल.. जाणून घ्या...
अक्षय्य तृतीया निमित्त तुम्हाला प्रसादात काहीतरी वेगळं करून पहायचंंय?
सण म्हटला की, या निमित्त लोक, कुटुंबीय आणि मित्र एकत्र येतात. भारतीय मिठाई सामान्यतः साखर, मैदा, सुका मेवा, दूध आणि बीन्स यासारख्या साध्या पदार्थांपासून बनवल्या जातात. आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्त तुम्हाला प्रसादात काहीतरी वेगळे करून पहायचे असेल आम्ही तुम्हाला खास रेसिपीबद्दल सांगत आहोत. सर्वात प्रिय आणि लोकप्रिय मिठाईंमध्ये राजस्थानच्या मोहनथलचा समावेश आहे. या राजस्थानी पदार्थाला 'बेसन की चिक्की' असेही म्हणतात. बेसन आणि मावा तुपात भाजून हा पदार्थ बनवला जाते. बेसनाच्या मिश्रणावर साखरेचा पाक ओतला जातो आणि सेट होऊ दिला जातो. ते सेट झाले की वेलची आणि चिरलेला सुका मेवा शिंपडला जातो. नंतर या मिठाईचे तुकडे केले जातात. आता लोकांनी ते अनेक प्रकारे बनवण्यास सुरुवात केली आहे, आपण आपल्या आवडीनुसार घटक देखील वापरू शकता. तुम्हाला फक्त आम्ही दिलेल्या रेसिपीचे पालन करावे लागेल. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, ते कसे तयार करता येईल ते सविस्तर जाणून घेऊया.
साहित्य
तूप - 1 वाटी
दूध - 1 कप
पाणी - 1 कप
वेलची पावडर - 4
बेसन - 2 वाट्या
सुका मेवा - 1 कप (चिरलेला)
मोहनथाल बनवण्याची पद्धत
मोहनथाल बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात 2 कप बेसन घ्या
एका कढईत 1 चमचे तूप गरम करा.
आता बेसन मंद आचेवर भाजून घ्या आणि गॅस बंद करा. नंतर एका भांड्यात काढा.
आता बेसनामध्ये दूध घालून पीठ बनवा.
पीठाला 20 मिनिटे विश्रांती द्या, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल.
नंतर कढईत अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घाला. 10 मिनिटे शिजू द्या.
साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात बेसन घालून वेलची पावडर, 1 चमचा तूप घाला. नंतर मंद आचेवर शिजवा.
आता हे मिश्रण एका ट्रेमध्ये ठेवा आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूंनी समप्रमाणात पसरवा.
त्यावर तुम्ही बदाम, काजू किंवा मनुका घालू शकता.
तुमचा मोहनथाल तयार आहे जो तुम्ही थंड करून सर्व्ह करू शकता.
पदार्थ बनवण्यासाठी एकूण वेळ: 30 मि
तयारीची वेळ: 15 मि
पाककला वेळ: 15 मि
सर्विंग्स : 4 मि
कोर्स: डेजर्ट
कॅलरीज : 175
पाककृती : भारतीय
हेही वाचा>>>
Food : उन्हाळ्यात हे 3 पदार्थ पचायला उत्तम! हलकं काही खायचं असेल तर रेसिपी जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )