एक्स्प्लोर
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या सुरक्षारक्षकांना नीट लक्ष देऊन पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर लक्षात येईल की, हे सुरक्षरक्षकांच्या डोळ्यांवर कायम गॉगल असतो. पण ते कायम गॉगल का घालतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायमच सनग्लासेस घालण्याचं कारण काय असू शकतं?
खरंतर सुरक्षारक्षकांनी गॉगल घालण्यामागची अनेक कारणं आहेत. पण त्यापैकी एक कारण म्हणजे, सुरक्षारक्षक कोणाच्याही न कळत त्यांच्यावर नजर ठेवू शकतात. शिवाय ते नेमके कुठे पाहत आहेत, हे लोकांना कळू नये अशी सुरक्षरक्षकांची इच्छा असले.
तसंच जर एखादी अनूचित घटना घडली, जसं की एखाद्याने अचानक गोळीबार सुरु केला किंवा जर बॉम्बस्फोट झाला तर सामान्यत: तुमच्या पापण्या काही क्षणासाठी बंद होतात. अशावेळी सामान्य लोकांपेक्षा या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थिती डोळ्यात तेल घालून काम करायचं असतं. त्यासाठी हे गॉगल फायदेशीर ठरतात.
शत्रूचे हावभाव समजून घेण्यासाठी आणि त्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज लावण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे असलेलं सर्वात मोठं साधन म्हणजे डोळे. डोळे आणि शारीरिक हावभाव समजून एखाद्याची पुढची प्रतिक्रिया काय असेल, हे समजून घेण्यात सुरक्षारक्षक प्रशिक्षित असतात. शत्रूंनी असं करु नये, यासाठी सुरक्षारक्षक डोळ्यांवर गॉगलचा आधार घेतात.
शेवटचं पण आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षारक्षकांना आपले डोळे कायम स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. धूळ आणि जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना गॉगलचा फायदा होतो. त्यांच्या शस्त्रांमध्ये दोन डोळ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे सुरक्षारक्षक सनग्लासचा आधार घेतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्राईम
भारत
वर्धा
Advertisement