(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pineapple Juice Benefits : उन्हाळ्याच्या दिवसांत प्या अननसाचा ज्यूस, ‘या’ समस्या होतील दूर!
Pineapple Juice Benefits : अननसाच्या रसामध्ये, तर त्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी चांगले मानले जाते.
Pineapple Juice Benefits : उन्हाळा आला की, लोकांना वेगवेगळे ज्यूस प्यायला आवडतात. कारण, ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच, पण शरीराला त्वरित थंडपणा देण्यासाठी फायदेशीर आहे. ज्यूसमुळे शरीराला ऊर्जा सोबतच रोगप्रतिकार शक्ती देखील मिळते. अशावेळी जर आपण अननसाचा रस प्यायला तो शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. अननसाच्या रसामध्ये, तर त्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी चांगले मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया अननसाच्या रसाचे सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत...
रक्तदाबात आराम
उन्हाळ्यात रक्तदाबाची समस्या खूप जास्त वाढते. अशा परिस्थितीत अननसाचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट आहेत, जे हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. अननसाच्या रसाचा आहारात नियमित समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.
वजन कमी होईल
वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अननसाचा रस देखील समाविष्ट करू शकता. त्यात व्हिटॅमिन सीसोबत लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यात प्रभावी आहेत. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल, तर याचे सेवन जरूर करा.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा
अननसाचा रस रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते, त्यात अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, त्यामुळे तो बॅक्टेरियाची समस्या दूर करण्यात प्रभावी आहे.
सांधेदुखीमध्ये फायदेशीर
उन्हाळ्यात सांधेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी अननसाच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. त्यात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे सांधेदुखी, पेटके इत्यादी समस्या कमी होतात. या व्यतिरिक्त, यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील भरपूर आहेत, जे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
हाडे मजबूत होतील
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर ठरतो. अननसाच्या रसामध्ये कॅल्शियम आणि मॅंगनीज सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, जे दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. यासोबतच याच्या सेवनाने हाडे आणि दातांचा समस्या देखील कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha