Diwali 2022: दिवाळीत खमंग आणि कुरकरीत चकली बनवायचीये? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
भाजणीची चकली अनेक जण दिवाळीला तयार करतात. जाणून घेऊयात चकलीची सोपी रेसिपी-
Diwali 2022: दिवाळी (Diwali 2022) हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला चकली, चिवडा, लाडू हे फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दिवाळीत खमंग आणि कुरकरीत चकली खायला अनेकांना आवडते. चकलीचे अनेक प्रकार असतात. गव्हाच्या पिठाची चकली, ज्वारीच्या पिठाची चकली, तसेच मैद्याची चकली आणि तांदळ्याच्या पिठाची चकली हे चकलीचे प्रकार आहेत. भाजणीची चकली अनेक जण दिवाळीला तयार करतात. जाणून घेऊयात चकलीची सोपी रेसिपी-
साहित्य:
चार छोटा कप चकलीची भाजणी
एक कप पाणी
अर्धा चमचा ओवा
एक टिस्पून तेल
एक चमचा लाल तिखट
एक टिस्पून हिंग
मिठ
कृती: चकलीच्या भाजणीमध्ये लाल तिखट, पाव चमचा ओवा, एक मोठा चमचा तिळ घाला. त्यानंतर त्यामध्ये मिठ आणि हळद घाला. जर भाजणीमध्ये धने घातले असतील तर भाजणीच्या पिठात धने घालू नका. हे मिश्रण मिक्स करुन घ्या. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घाला. त्यानंतर हे पिठ मळून घ्या. यामध्ये एक किंवा दीड कप गरम पाणी घाला. हे पिठ चमच्यानं मिक्स करा. हे पिठ 10 मिनीट झाकून ठेवा. त्यानंतर या पिठाचा गोळा तयार करा. त्यामधून छोटा पिठाचा गोळा काढा. तो चकलीच्या साच्यामध्ये घाला. चकल्या गोल आकारात एका प्लॅस्टिकच्या पेपरवर पाडून घ्या. या चकल्या गरम तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळा.
चकलीची भाजणी
एक कप तांदूळ धुवून आणि वाळवून घ्या. ते तांदूळ एका भांड्यात घेऊन ते चार ते पाच मिनीट भाजून घ्या. त्यानंतर ते तांदूळ एका डिशमध्ये काढा. त्यानंतर अर्धा कप चणा डाळ भाजून घ्या. एक मोठा चमचा उडदाची डाळ भाजून घ्या. साबूदाणा देखील भाजून घ्या. जाड पोहे आणि एक चमचा धणे भाजून घ्या. हे सर्व भाजलेल्या गोष्टी एकत्र मिक्स करा. या गोष्टी दळून घ्या. त्यानंतर तयार झालेलं पिठ चाळून घ्या.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Diwali Food and Recipe: पौष्टिक आणि चविष्ट! या दिवाळीला घरच्या घरी बनवा बेसनाचे लाडू, वाचा रेसिपी