एक्स्प्लोर

Diwali Food and Recipe: पौष्टिक आणि चविष्ट! या दिवाळीला घरच्या घरी बनवा बेसनाचे लाडू, वाचा रेसिपी

Diwali Recipe : शुद्ध तुपाचे बेसन लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी माव्याचीही गरज नाही. बेसनाचे हे लाडू खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असतात.

Diwali Recipe : दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की, घरोघरी महिनाभर आधीच सगळ्या कामांची सुरुवात होते. साफसफाई, मिठाई, फराळ या सगळ्यांचीच लगबग प्रत्येक घरात दिसून येते. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी लोक आपली घरे दिव्याने सजवतात आणि भरपूर मिठाई, फराळ बनवतात. या खास निमित्ताने अनेकजण आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजनही करतात. दिवाळी पार्टीमध्ये लोक पाहुण्यांसाठी विविध प्रकारचे पदार्थ, मिठाई आणि फराळ तयार करतात (Diwali Food and Recipe). या दरम्यान बाजारातून विकत आणलेले पदार्थ भेसळयुक्त असतील का? याची चिंता सर्वांनाच असते. असे पदार्थ खाल्ल्याने शरीराला हानी पोहचू शकते. हे टाळण्यासाठी आपण घरच्या घरी सोपी रेसिपी वापरून लाडू, चिवडा, चकली यांसारखे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकतो.

शुद्ध तुपाचे बेसन लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी माव्याचीही गरज नाही. बेसनाचे हे लाडू खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असतात. जाणून घ्या बेसन लाडू बनवण्याची सोपी रेसिपी (Diwali Recipe)..

बेसनाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

अर्धा किलो बेसन

अर्धा किलो पिठीसाखर

400 ग्रॅम तूप

4 टीस्पून रवा

10-12 काजू

10-12 बदाम

बेसनाचे लाडू बनवण्याची रेसिपी (Besan Laddu Recipe) :

* प्रथम बेसन भाजण्यासाठी एक जाड बुडाचे पातेले घ्या. त्यात बेसनासोबातच तूपही टाका आणि बेसन चांगले भाजून घ्या.

* बेसनाचे लाडू बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन व्यवस्थित भाजणे. यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवा, मात्र नंतर ती हळूहळू कमी करा.

* मध्यम आचेवर सतत ढवळत बेसन व्यवस्थित भाजून घ्या. बेसन जसजसे व्यवस्थित भाजले जाईल तसतसे ते पातळ होईल.

* बेसनाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत नीट भाजून घ्या. बेसन भाजायला किमान 25 मिनिटे लागतात.

* बेसन भाजल्यावर गॅस बंद करा आणि बेसन थंड होईपर्यंत थोडावेळ ढवळत राहा. कारण, पातेले गरम असल्याने बेसन करपू शकते.

* आता दुसऱ्या एका भांड्यात 2 चमचे तूप घालून रवा थोडा भाजून घ्या. आता हा रवा भाजलेल्या बेसनात मिसळा.

* आता बेसनाच्या या मिश्रणात पिठीसाखर आणि काजू बदामाचे काप करून टाका.

* आता सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करा आणि तुमच्या आवडीनुसार बेसन लाडू वळून घ्या. थंड होऊन थोडे कडक झाले की, हे लादून तुम्ही घरी येणाऱ्या पाहुण्यांना किंवा देवाच्या प्रसादालाही वापरू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरयाणातून उचललं
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
अरे झालंय काय,वागताय काय! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ईशान्य मुंबईच्या 'भावी' खासदारांमध्ये जुंपली
Embed widget