एक्स्प्लोर
अंघोळीच्यावेळी तुमच्याकडून या चुका होतात का?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Mar 2017 05:23 PM (IST)
1/6

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला शरीर स्वच्छतेसाठी अंघोळ गरजेची असते. मात्र, आंघोळीवेळी तुमच्याकडून रोज अशा काही चुका होतात, त्यातून तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही परिणाम होतो. कारण आंघोळीच्या निमित्ताने जास्तवेळ पाण्यात राहिल्याने तुमच्या शरिरातील नॅचरल ऑईल्स नष्ट होऊन, त्याची त्वचा कोरडी बनते. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी आंघोळीवेळी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याविषयी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.
2/6

शॉवरखाली जास्त काळ घालवणे : जर तुम्ही अंघोळीच्या निमित्ताने 30 मिनिटाचा काळ पाण्यात घालवत असाल, तर ते तुमच्या त्वचेसाठी अपायकारक होऊ शकतं. कारण याने तुमच्या त्वचेचा ओलावा नष्ट होतो. तेव्हा जर तुम्ही शॉवरखाली अंघोळ करत असाल, तर जास्तीत जास्त 10 मिनिटांचाच अवधी अंघोळीसाठी वापरावा.
3/6

गरम पाणी : अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. कारण यातून त्यांच्या स्नायूंना आराम मिळतो असा समज असतो. पण अंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्यांच्या शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होतं. आंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापरानं त्याची त्वचा ड्राय (कोरडी) बनते. त्यामुळे शरिराला खाज सुटते. त्यामुळे जर तुम्ही थंड हवामानाच्या परिसरात राहात असाल, तर आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
4/6

याशिवाय अंघोळीच्यावेळी केस चांगल्याप्रकारे धुवावेत. तसेच अंघोळीदरम्यान तोंडावाटे साबण तोंडात गेला असल्यास गुळण्या कराव्यात.
5/6

सुगंधी साबणाचा वापर : अंघोळीसाठी सुगंधी साबणाच्या वापरानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे अंघोळीसाठी एशेंशियल ऑईल युक्त साबण वापरल्यास त्वचेसाठी चांगले असते.
6/6

अंघोळीचा ब्रश योग्यवेळी बदलावा : अंघोळीसाठी वापरण्यात येणारा ब्रश त्वचेसाठी चांगला असतो. पण तो अधिकच जुना झाला असल्यास वेळीच बदलावा. कारण, जुन्या ब्रशच्या वापरानं तुमच्या त्वचेला इजा पोहचू शकते. त्यामुळे जितके जुने बॉडी पफ किंवा ब्रश असेल, तितकाच शरिरावर किटाणू जमण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अंघोळीचा ब्रश एक महिन्यांच्या कालावधीनंतर बदलावा.
Published at : 25 Mar 2017 05:23 PM (IST)
Tags :
साबणSponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
लाईफस्टाईल
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
लाईफस्टाईल
नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
लाईफस्टाईल
तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या





















