Christmas 2023 : ख्रिसमसला मुलांसाठी बनवा 'हे' 5 हेल्दी केक; चवीबरोबरच आरोग्याची काळजी घ्या
Christmas 2023 : ख्रिसमसला दिल्या जाणाऱ्या केकमध्ये अनेकदा ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो.
Christmas 2023 : ख्रिसमसचा (Christmas 2023) सण जवळ आला आहे. त्यामुळे सेलिब्रेशन तर जोरात असतंच आणि हे सेलिब्रेशन केकशिवाय पूर्ण होत नाही. ख्रिसमसला लहान मुलंही केक खाण्याचा आग्रह धरतात. बाजारात ख्रिसमसचे खास डेकोरेटिव्ह केक पाहून मुलांना केक खाण्याचा मोह होतो. मात्र, मुलांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना बाहेरच्या गोष्टी खाण्यास देऊ नका. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरी हेल्दी केक बनवून तुमच्या मुलाला देऊ शकता.
ख्रिसमसला दिल्या जाणाऱ्या केकमध्ये अनेकदा ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो. या ख्रिसमसमध्ये तुमच्या मुलांना हे पाच प्रकारचे केक नक्कीच खाऊ घाला. ते घरगुती वस्तूंपासून बनवलेले असल्यामुळे ते तुमच्या मुलांसाठी आरोग्यदायी असतात आणि बनवायलाही खूप सोपे असतात.
लेमन ड्रिजल केक
जर तुम्हाला एक तासापेक्षा कमी वेळेत केक बनवायचा असेल तर लेमन ड्रिजल केक नक्कीच करा. हा केक करण्यासाठी, लिंबाचा रस, अंडी, ताक, ऑलिव्ह ऑईल, सीड्स घ्या. यानंतर, ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करा. या केकची रेसिपी तुम्हाला सहज मिळेल. आयसिंग शुगरमध्ये लिंबाचा रस मिसळून तुम्ही लेमन ड्रिजल केक तयार करू शकता.
ब्ल्युबेरीची मफीन्स
मफिन्स चवीलाही चांगले असतात. हे लहान कपच्या आकारात उपलब्ध असतात, म्हणूनच मुलांना हा केक खूप आवडतो. मफिन्स खूप लवकर तयार होतात. ते अधिक हेल्दी बनवण्यासाठी, तुम्ही त्यात चिया सीड्स टाकू शकता. जर फ्रेश ब्लूबेरी उपलब्ध नसेल तर तुम्ही फ्लेवर्ड ब्लूबेरी देखील वापरू शकता.
वेलची पिस्ता केक
अंडी आणि मैदा व्यतिरिक्त, या केकचे स्टार घटक पिस्ता आणि वेलची आहेत जे या केकची चव आणखी वाढवतात. हा केक बनवण्यासाठी वेलचीच्या पाकळ्यांची पावडर बनवा. जर मुलांना ड्रायफ्रुट्स खायला आवडत नसेल तर तुम्ही कोरफड बरोबर पिस्त्याची पावडर बनवू शकता. हा केक बनवायला 45-50 मिनिटे लागतील. तो थंड झाल्यावर केकच्या कापांना क्रीमने सजवा आणि सर्व्ह करा.
नट्स आणि ड्राय फ्रूट्स केक
या केकमध्ये सुका मेवा मुबलक प्रमाणात टाकला जातो. हे करण्यासाठी, ओव्हन 190 अंशांवर सेट करा. हा केक बनवायला फक्त अर्धा तास लागतो. जर तुम्हाला झटपट केक बनवायचा असेल तर नट्स आणि ड्रायफ्रूट्स केक नक्की ट्राय करा. सुका मेवा भरपूर असल्याने मुलांना ते खूप आवडते.
फ्रूट केक
जर तुम्ही लहान मुलांसाठी केकमध्ये हेल्दी पर्याय शोधत असाल तर फ्रूट केक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. बहुतेक मुलांना फळे खायची नसतात, या केकद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना फळे खाऊ शकता. कारण हा केक बनवताना भरपूर फळे वापरली जातात, त्यात साखर घालायची गरज नाही. हा शुगर फ्री केक मुलांसाठी खूप हेल्दी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Christmas 2023 : ख्रिसमसच्या उरलेल्या केकचं काय कराल? 'असा' केक साठवून ठेवा, महिनाभर टिकेल