(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Christmas 2023 : भारतातील 'या' ठिकाणी ख्रिसमसचा उत्सव असतो खूप खास; तुम्हीही सामील होऊ शकता
Christmas 2023 : ख्रिसमसचे सेलिब्रेशन जगभर पाहायला मिळते, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या ठिकाणी तुम्ही खूप खास ख्रिसमस सेलिब्रेशन पाहू शकता.
Christmas 2023 : डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमस (Christmas 2023) आणि नवीन वर्षाची चाहूल लागलेली असता. अर्थात नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. अशातच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सेलिब्रेशनचे तुमचेही काही प्लॅन्स असतील. 25 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत असा लॉंग विकेंडचा जर तुमचा प्लॅन असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही छान सेलिब्रेशनच्या जागा सांगणर आहोत. ज्या फिरण्यासाठी आणि सेलिब्रेशनसाठी एकदम परफेक्ट असतील. या ठिकाणी तुम्ही ख्रिसमस अगदी आनंदाने साजरा करू शकता. त्याआधी ख्रिसमस कुठे खास पद्धतीने साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.
गोवा (Goa)
गोव्यात नेहमीच काही ना काही उत्सव होत असतात. पण डिसेंबरमध्ये गोवा हा अनेक अर्थाने खास आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दूरदूरवरून पर्यटक येथे येतात आणि नवीन वर्षानंतर तेथून निघून जातात. गोव्यात नाईट लाईफ वेगळी आहे, पण इथे ख्रिसमसही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या काळात केवळ चर्चच नाही तर रस्त्यांवर आणि इमारतींवरही रंगीबेरंगी दिवे दिसतात.
पाँडिचेरी (Puducherry)
पाँडिचेरी हे भारताचे "लिटल फ्रान्स" असेही म्हणतात. फ्रेंच लोकांनी येथे दीर्घकाळ राज्य केले. येथे मोठ्या संख्येने ख्रिश्चन लोक राहतात, त्यामुळे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुम्ही ख्रिसमस लाँग वीकेंडमध्ये येथे येण्याची योजना करू शकता. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भूत ठिकाणे आहेत.
सिक्कीम (Sikkim)
ईशान्य सिक्कीममध्ये येऊन तुम्ही ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. डिसेंबर महिन्यात सिक्कीममध्ये खूप थंडी असते, इथे ख्रिसमसचा सण खूप छान साजरा केला जातो.
केरळ (Kerala)
केरळ हे भारतीयांचे सर्वात आवडते शहर आहे. लोक इथे सतत भेट देतात. तुम्हीही खूप दिवसांपासून इथे येण्याचा विचार करत असाल, तर ख्रिसमस ही सर्वोत्तम संधी आहे. येथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. त्यामुळे या उत्सवाची भव्यता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक चर्चमध्ये पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.