Buttermilk Use : ताक वापरून वाढवा सौंदर्य; त्वचा आणि केस होतील सुंदर, 'या' टीप्स एकदा वापरून पाहा
Buttermilk For Skin and Hair : ताक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का, आरोग्यासोबतच ताक त्वचेलादेखील चमकदार बनवते आणि केसांसाठीही फायदेशीर आहे.
Buttermilk For Skin and Hair : साधारणपणे उन्हाळ्यात ताक (Buttermilk) पिण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण उन्हाळ्यात ताक शरीरातील दाहकता कमी करतो. अनेक गुणांनी युक्त ताक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आरोग्यासोबतच ताक त्वचेला देखील चमकदार बनवते, हे तुम्हाला माहित नसेल. इतकंच नाही तर ताकाचा वापर करुन केसांचे सौंदर्यही वाढवता येते. ताक त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. जाणून घ्या ताक वापरून त्वचा आणि केसांवर सौंदर्य कसे वाढवता येते.
त्वचा होईल सुंदर
चेहर्यावरील डाग आणि खुणा ताक वापरून दूर करता येतील. ताकाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग कमी करता येतात. संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये ताक मिसळून याचा फेस पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळ हा पॅक वापरा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
त्वचा होईल सुंदर
- चेहर्यावरील डाग आणि खुणा ताक वापरून दूर करता येतील. ताकाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग कमी करता येतात. संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये ताक मिसळून याचा फेस पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळ हा पॅक वापरा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
- जर तुम्हाला चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर अर्धा चमचा मसूर डाळ पावडर आणि एकच चमचा बेसन एकत्र करून त्यात ताक मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तजेलदार होईल. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.
- ताक वापरल्याने त्वचेवरील टॅनिंग आणि डाग दूर होण्यास मदत होते. जर तुम्ही घरी स्क्रब बनवत असाल तर त्यात ताक मिसळा आणि लावा. हे छिद्र उघडते आणि नैसर्गिक चमक देते.
ताक वापरून केस बनवा अधिक सुंदर
- तुमचे केस कोरडे आणि कमकुवत झाले असतील तर तुम्ही ताक वापरून केसांनां चमकदार बनवू शकता. यासाठी हेअर पॅक ट्राय करा.
- केळी मॅश करून त्यात ऑलिव्ह आणि ताक मिसळून मास्क बनवा. हा हेअर मास्क केसांना लावून अर्धा तास राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. हे मास्क लावल्याने केसांचे आरोग्य सुधारेल. तुमचे केस दाट, मजबूत होतील.
- केसांमध्ये कोंडा झाला असेल आणि टाळूवर खाज येण्याची समस्या असल्यास हलक्या हातांनी ताकाने टाळूवर मसाज करा. नंतर केस स्वच्छ धुवा. ताकाचा वापर केल्याने डोक्यातील कोंड्यापासून तुमची सुटका होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.