Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी’च्या खेळात मोठा ट्विस्ट येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६चा प्रवास अवघ्या तीन दिवसांचा असतानाच घरात वातावरण चांगलंच तापलं आहे. घराचा दरवाजा उघडताच स्पर्धकांमध्ये रणनीती, गटबाजी आणि वादांची ठिणगी पहिल्याच दिवसापासून पडलेली दिसतेय. सुरुवातीपासूनच काही चेहरे प्रेक्षकांच्या आणि घरातील सदस्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे रुचिता जामदार.
पहिल्याच दिवशी तन्वीशी झालेला वाद आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबतची जोरदार खडाजंगी यामुळे रुचिता घराच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या प्रत्येक हालचालीकडे घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचंही लक्ष लागून आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी’च्या खेळात मोठा ट्विस्ट येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नेमकं काय आहे प्रोमोमध्ये?
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. "पॉवर की ला हलक्यात घेणं, पडलं रुचिताला भारी!" आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
View this post on Instagram
ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरेल. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस यांना सांग पॉवर key करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या बिग बॉस मराठीच्या भागात. रितेश देशमुखच्या 'लयभारी' स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू 'डेंजर' वळण घेऊ लागला आहे. आज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर.























