'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
हे मत ऐकून राधा भावनिक झाल्याचं दिसतं. तिने थेट समोर न बोलता, दिपालीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 सुरू होताच घरात मतभेदाचे आणि भांडणाचे सूर लागले आहेत. एकमेकांविषयी तोंडावर वाईट साईट बोलणं हे बिग बॉसच्या घरात काही नवीन नाही. अवघ्या दुसऱ्या दिवशीच घरात एक असा वाद पेटताना दिसणार आहे, ज्याची चर्चा बाहेरही रंगू लागली आहे. हा वाद आहे प्रसिद्ध लावणी कलाकार दिपाली सय्यद आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेली नृत्यांगना राधा पाटील यांच्यात. लावणी आणि डान्स यावरून झालेल्या दोघींमध्ये वादाला आक्रमक स्वरूप आलं. दिपालीच्या बोलण्याने राधा दुखावल्याच दिसलं. तिनंही आक्रमक भूमिका घेत मी पण लायकी काढू शकते असं म्हटल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय.
दिपाली सय्यद Vs राधा पाटील
दिपाली सय्यदने गेल्या अनेक वर्षांत आपल्या लावणी नृत्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लावणीच्या परंपरेतून आलेली शिस्त, सौंदर्य आणि संस्कृती याबाबत त्या नेहमीच ठाम भूमिका मांडताना दिसतात. अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करताना त्यांनी नवोदित कलाकारांसाठी आदर्श ठरतील अशी प्रतिमा तयार केली आहे.
दुसरीकडे, राधा पाटील ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि डान्समुळे चर्चेत राहिलेली स्पर्धक आहे. गौतमी पाटीलसोबत झालेल्या वादानंतर राधाचं नाव घराघरात पोहोचलं. ‘बिग बॉस’च्या घरात येतानाच तिने कोणालाही घाबरत नसल्याचं जाहीर केल्यामुळे तिच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दिपालीची ठाम मतं, बिगबॉसच्या घरात दोन्ही नृत्यांगना आक्रमक
घरातील एका चर्चेदरम्यान दिपालीने लावणीच्या सादरीकरणाबाबत परखड मत व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडलेल्या या नृत्यप्रकाराची भेसळ होत असल्याची खंत तिने बोलून दाखवली. हे मत ऐकून राधा भावनिक झाल्याचं दिसतं. तिने थेट समोर न बोलता, दिपालीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाली दीपाली ?
"लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण... त्याला तुम्ही चीप करुन टाकलंय. बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता", ही टिप्पणी अभिनेत्री दिपाली सय्यदने बिग बॉसच्या घरात केली. त्यानंतर नृत्यांगणा राधा पाटील भावुक झाली आणि आक्रमकपणे बोलतानाही पाहायला मिळाली. दिपालीला प्रत्युत्तर राधा पाटीलने देखील इशारा दिला. "दिपाली ताई मला लावणीवरुन मला बोलत आहेत. मी पण लायकी काढू शकते" ती पण डान्समध्ये होती. तिचं कुठे नाव येतं डान्समध्ये. असं राधा म्हणाली.
View this post on Instagram
हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया अक्षरशः उसळल्या आहेत. काही जण दिपालीच्या अनुभवाला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर काही जण राधाच्या बाजूने उभे राहिले आहेत. लावणी, अभिव्यक्ती आणि संस्कृती यावरून सुरू झालेला हा वाद पुढे नेमकं कुठं जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.आता घरातील इतर स्पर्धक कोणाची बाजू घेणार आणि हा वाद खेळावर काय परिणाम करणार, याचा उलगडा आजच्या भागात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ -रोज रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.























