Best Tea For Winter : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'या' खास चहाचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल
Best Tea For Winter : जर तुम्ही दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर येथे जाणून घ्या दिवसभरात कोणता चहा प्यावा.
Best Tea For Winter : आपल्यापैकी बहुतेकांना चहा (Tea) प्यायला आवडतो. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतात. विशेष म्हणजे जे लोक सहसा चहा पीत नाहीत, त्यांना हिवाळ्यात चहा प्यायला विशेष आवडतो. मात्र, अधिक चहा प्यायल्याने आरोग्य बिघडते. त्यामुळे थंडीत चहाही प्यायचा आहे आणि आरोग्याची काळजीसुद्धा घ्यायची असेल, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही खास चहाबद्दल माहिती सांगणार आहोत. जी प्यायल्याने तुमची टेस्टही बदलेल आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढेल. म्हणजेच सर्दी, ताप यांसारखे आजार तुमच्यापासून दूर राहतील.
1. मसाला चहा
मसाला चहामध्ये हळद-जिरे प्रकारचे मसाले घालू नयेत. त्यापेक्षा काही खास आणि निवडक गोष्टी वापराव्यात.
- दालचिनी
- लवंग
- काळी मिरी
- वेलची
- आले
मसाला चहा कसा बनवायचा?
- एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात एक चतुर्थांश चमचा चहाची पाने घाला.
- नंतर त्यात थोडी दालचिनी, एक काळी मिरी, हिरवी वेलची, आले टाका.
- पाणी उकळायला लागल्यावर त्यात दूध टाका आणि उकळी आल्यावर त्यात चवीनुसार साखर किंवा गूळ घाला.
- त्यानंतर चहाला जास्त कढ आणू नका. गॅस लगेच बंद करा आणि चहाचा आनंद घ्या.
- जेव्हा तुम्हाला झोप येत असेल आणि तुम्हाला काम करायचे असेल अशा वेळी हा चहा घ्या. यामुळे तुम्हाला ऊर्जाही मिळेल आणि प्रतिकारशक्तीही वाढेल.
2. हळदीचा चहा
हळदीच्या चहाचे नाव ऐकताच तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या चहाने दिवसाची सुरुवात करायची नाही, तर हा चहा तुम्ही दुपारी किंवा रात्री प्यावासा वाटत असेल तर कधीतरी घेऊ शकता.
हळदीचा चहा कसा बनवायचा?
- 1 कप पाणी
- 1/4 चमचे हळद
- गूळ चवीनुसार
- 1 हिरवी वेलची
- सर्व प्रथम पाणी उकळायला ठेवा आणि त्यात हिरवी वेलची टाका.
- पाणी उकळायला लागल्यावर त्यात हळद घालून गूळ घाला.
- तो गाळून घ्या आणि या चहाचा आस्वाद घ्या. तुम्ही जेवल्यानंतरही हा चहा घेऊ शकता.
3. तुळशी-आले चहा
आले आणि तुळशीच्या पानांचा वापर हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये चहा बनवण्यासाठी केला जातो. कारण हे दोघेही हिवाळ्यात होणाऱ्या मौसमी आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. तुळशी आणि आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे सर्दी, खोकला इत्यादी कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना वाढू देत नाहीत. तुमच्या दिवसाची सुरुवात या चहाने करा. तुम्हाला ताजेपणा जाणवेल.
तुळस-आले चहा कसा बनवायचा?
तुळशी आणि आल्याचा चहा बनवताना हे लक्षात ठेवा की, सुरुवातीला चहाच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावी लागतात. नंतर आलं घालावे. असे केल्याने चहाचा सुगंध, चव आणि गुणधर्म टिकून राहतात.
- सर्वप्रथम पाणी गरम ठेवा आणि त्यात तुळशीची पाने आणि चहाची पाने टाका.
- उकळी आल्यावर त्यात आले घालून एकदा उकळून घ्या. आता त्यात दूध घाला आणि उकळी येताच गॅस बंद करा.
- तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी कपमध्ये चहा गाळून घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा