Benefits Of Mangoes : फळांचा राजा आंबा फक्त चवीलाच गोड नाही, तर आरोग्यासाठीही गुणकारी; वाचा जबरदस्त फायदे
Benefits Of Mangoes : प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापर्यंत आंब्याचे अनेक फायदे आहेत.
Benefits Of Mangoes : उन्हाळा (Summer) आणि आंबा (Mango) हे जणू एक समीकरणच झालंय. दरवर्षी मे महिना आला की आंब्यांची आठवण येतेच. फळांचा राजा असणारा आंबा सगळेच अगदी चवीने खातात. आंबा फक्त चवीलाच गोड नाही तर आरोग्याच्या (Health) दृष्टीनेही फायदेशीर आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापर्यंत आंब्याचे अनेक फायदे आहेत.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त
आंबा बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे. आंब्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक आहे आणि वय-संबंधित मॅक्युलर डीजेनरेशनपासून संरक्षण करण्यात मदत करू शकते.
प्रतिकारशक्ती वाढते
आंबा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे. हा एक अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्हिटॅमिन सी शरीराला संसर्ग आणि रोगापासून वाचवण्यास मदत करू शकतात.
कर्करोगाचा धोका कमी
आंब्यामध्ये मँगिफेरिन हे अँटीऑक्सिडेंट असते. यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. मँगीफेरिन पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात तसेच कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करू शकतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
आंबा पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण हे खनिज आहे. पोटॅशियम रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करते आणि हृदयविकार टाळण्यास देखील मदत करू शकते.
पचनशक्ती सुधारते
आंबा हा फायबरचा उत्तम स्त्रोत मानला जातो. आंब्यामुळे पचनशक्तीही सुधारते. फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करते.
वजन कमी करते
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा एक चांगला उपाय आहे. आंब्यामध्ये असलेले फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी होते. ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.
स्मरणशक्ती वाढवते
ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे, त्यात आढळणारे ग्लूटामाईन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. यासोबतच रक्तपेशीही सक्रिय होतात, त्यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.
त्वचा चांगली राहते
आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो आणि व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासूनही बचाव होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या बातम्या :