Tea : चहासोबत 'या' 6 गोष्टी पदार्थ घातक, होईल वाईट परिणाम...
Bad Tea Combinations : चहासोबत हे सहा पदार्थ खाणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरेल.
Bad Tea Combinations : चहा (Tea) हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. चहा प्यायली नाही तर काहींचा दिवसही खराब जातो, असं काही जण सांगतात. पण जास्त चहा पिणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. जास्त चहा प्यायल्यास अपचन, गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अनेकांनी चहासोबत काही पदार्थ खाण्याची सवय असते. योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण चहासोबत वेगवेगळे पदार्थ खातात. पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.
चहासोबत कोणते पदार्थ खावेत किंवा कोणते पदार्थ खाऊ (Bad Tea Combinations) नयेत, याबाबत बहुतेकांना योग्य माहिती नसते म्हणून आज आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देणार आहोत. जाणून घ्या चहासोबत कोणते पदार्थ खाणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.
1. बेसनचे पदार्थ खाणं टाळा.
काही लोक चहासोबत बेसन असलेले पदार्थ जसे की भजी किंवा इतर पदार्थ खातात. पण चहा आणि बेसन मिश्रण आरोग्यासाठी वाईट आहे. बेसनाचे पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
2. चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये.
दुधाच्या चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. विशेषतः लिंबाचं सेवन टाळावं. कारण चहामध्ये दुध असल्यास त्यावर लिंबातील अॅसिडचा परिणाम होईल आणि हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
3. चहासोबत कच्चे पदार्थ खाऊ नये.
चहासोबत सॅलड, उकडलेलं अंडे, मोड आलेली कडधान्यं अशा कच्च्या पदार्थांचं सेवन करू नये.
4. चहासोबत थंड पदार्थांचं सेवन करु नका.
चहासोबत थंड पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. चहासोबत कोणतेही थंडी पदार्थ खाल्याने त्याचा शरीरावर दुष्परिणाम होईल. सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा देखील थंड पदार्थांमध्ये समावेश होईल. चहा गरम असतो यासोबत थंड पदार्थ खाल्याने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
5. चहासोबत चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत
हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. अनेकांना सकाळी नाश्त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचं सॅलड आणि चहा पिण्याची सवय असते. पण हे मिश्रण आरोग्यासाठी वाईट आहे. हे दोन्ही पदार्थ सेवन करताना यांच्यामध्ये किमान एक तासाचं अंतर ठेवा.
6. चहासोबत हळदयुक्त पदार्थांचं सेवन टाळावं.
चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे सेवन करु नये. हळदीमध्ये द्रव घटक असतात, ज्याच्या रासायनिक अभिक्रियाने तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या