एक्स्प्लोर

2nd September 2022 Important Events : 2 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2nd September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील 2 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.

2nd September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 सप्टेंबरचे दिनविशेष.

 जागतिक नारळ दिन (World Coconut Day)

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या लागवडीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.

1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)

भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो जेणेकरून ते आजारमुक्त निरोगी जीवनशैली राखू शकतील.

1999 : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

1970 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.

1573 : अकबराने अहमदाबादजवळ निर्णायक युद्ध जिंकले आणि गुजरात ताब्यात घेतला. या विजयाच्या आनंदात बुलंद दरवाजा बांधण्यात आला.

1945 : सहा वर्ष चाललेले दुसरे महायुद्ध जपानने पराभव स्वीकारल्यानंतर संपले.

1946 : जवाहरलाल नेहरू यांच्या उपअध्यक्षतेखाली भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना.

1969 : पहिले ऑटोमॅटिक टेलर मशीन (ATM) न्यूयॉर्क, यूएसए येथे जगासमोर आणले गेले.

1976 साली प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित मराठी लेखक, कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन.

वि. स. खांडेकर हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. वि.स. खांडेकर यांचा जन्म सांगलीत झाला. त्यांच्या कार्यकाळात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना आणि समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. 'ययाति' या कादंबरीसाठी त्यांना 1960 साली साहित्य अकादमी पुरस्काराने तर,1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget