26th May 2022 Important Events : 26 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
26th May 2022 Important Events : मे महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
26th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 मे चे दिनविशेष.
1945 : विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचा जन्म.
विलासराव दगडोजीराव देशमुख हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. 1974 साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव 18 ऑक्टोबर, इ.स. 1999 ते 16 जानेवारी, इ.स. 2003 आणि 1 नोव्हेंबर, इ.स. 2004 ते 4 डिसेंबर, इ.स. 2008 या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख हे भारतातील राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी यापूर्वी भारत सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आणि पंचायती राज मंत्री आणि भारत सरकारचे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री ही पदे भूषवली होती. ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य होते.
सन 1937 साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री करिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायक आणि विनोदकार गोपीशांता यांचा जन्मदिन.
सन 1961 साली सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओकरिता ग्रॅमी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट, संगीत व्हिडीओ आणि जाहिरात दिग्दर्शक आणि व्यावसायिक तरसेम सिंह यांचा जन्मदिन.
सन 1999 साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने 318 धावांचा विश्वविक्रम केला.
सन 2014 साली भारतीय जनता पक्षाचे सदस्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
भारतीय जनता पक्षाचे संसदीय नेते नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, त्यांच्या पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ सुरू केला. पंतप्रधान मोदींसोबत इतर 45 मंत्र्यांनीही शपथ घेतली.
महत्वाच्या बातम्या :