एक्स्प्लोर

18th May 2022 Important Events : 18 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना 

18th May 2022 Important Events : मे महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या. 

18 th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 18 मे चे दिनविशेष.
 
1682 : मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती, छत्रपती शाहूराजे भोसले यांची जयंती 

थोरले शाहू महाराज यांचा जन्म 18 मे मे 1682 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव होते. जन्मापासूनच ते मोंगल बादशहा औरंगजेबाच्या त्याब्यात होते. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूंना सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी 1707 पासून ते मरेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबर 1749 पर्यंत राज्य चालविले. साताऱ्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. 

1913 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांची जंयती  
पुरुषोत्तम केशव काकोडकर यांचा  जन्म 18 मे 1913 रोजी झाला. कोकोडकर हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील होते. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता. 

1933 : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची जयंती 
सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला. सिविल इंजिनीरिंग पदवी धारक  देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या   देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला.  11 डिसेंबर 1994 रोजी ते कर्नाटकाचे 14 वे मुख्यमंत्री बनले. 30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

1048 : पर्शियन कवी उमर खय्याम यांची जयंती 
 उमर खय्याम हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आणि कवी होते. ईशान्य इराणमधील निशापूर येथे जन्मलेल्या खय्याम यांनी आपले बहुतेक आयुष्य कारखानिद आणि सेल्जुक शासकांच्या दरबारात घालवले. 

1872  :इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ बर्ट्रान्ड रसेल यांची जयंती 

1897 : अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक फ्रॅंक काप्रा यांची जयंती 

1931 : अमेरिकन व्यंगचित्रकार डॉन मार्टिन यांची जयंती 

1979 : माईनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गेंस्टन यांची जयंती 


2017 : जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांची पुण्यतिथी  
रीमा लागू  यांचा जन्म  मुंबईतील गिरगांव येथे 21 जून  १९५८ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी आणि  हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटांमधील तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम चांगलेच गाजले. 18 मे 2017 रोजी त्यांच निधन झाले. 

1846 : मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी 

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे  20  जानेवारी 1822 रोजी झाला. त्यांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. 1825 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे  इंग्रजी आणि संस्कृतचे शिक्षण घेतले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. 

मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 18  मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला. 

1997 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांची पुण्यतिथी 
भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई कामत ओळखल्या जातात. प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले व प्रसिद्ध तबला वादक लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले यांच्या त्या आई होत. त्याचप्रमाणे आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या त्या आजी. 6 सप्टेंबर 1901 रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. तर 18 मे 1997 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

2015 : भारतीय परिचारिका अरुणा शानबाग यांची पुण्यतिथी 
अरुणा रामचंद्र शानबाग यांचा 1 जून 1948 रोजी झाला. एक भारतीय परिचारिका म्हणून त्यांची ओळख होती. 1973 मध्ये परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल भरत वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला होता. या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा फास आवळला गेल्याने त्या निश्चल अवस्थेत गेल्या होत्या. जवळपास 42 वर्ष मृत्यूशय्येवर घालवल्यानंतर अरुणा शानबाग यांचे 18 मे 2015 रोजी मुंबईत निधन झाले.  

1999: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांची पुण्यतिथी 
 1808 : बोर्नबॉन व्हिस्कीचे निर्माते एलीया क्रेग  यांची पुण्यतिथी

1966: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी  यांची पुण्यतिथी
1986 : स्थापत्य अभियंते कानरू लक्ष्मण राव  यांची पुण्यतिथी

  •  महत्वाचे दिवस  
    1804 : नेपोलियन बोनापार्ट फ्रांसच्या सम्राटपदी.
    1912 : पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.
    1917 : अमेरिकन कॉंग्रेसने नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिला.
    1938 : प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
    1940: प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.
    1944 : दुसरे महायुद्ध-मॉन्टे कॅसिनोची लढाई - उभय पक्षातील 20 हजार सैनिकांच्या मृत्यूनंतर जर्मन सैन्याची पीछेहाट.
    1953 : जॅकी कॉक्रन ही स्वनातीत विमान चालवणारी प्रथम स्त्री ठरली.
    1958 : अमेरिकेच्या एफ.104 स्टारफायटर विमानाने ताशी 2,259.82 कि.मी.चा वेग गाठून विक्रम प्रस्थापित केला.
    1969 : अपोलो 10 चे प्रक्षेपण.
    1972 : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
    1974 : भारताने पोखरण 1 परमाणू परीक्षण केले आणि भारत परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला.
    1980 : पेरूमध्ये शायनिंग पाथ या अतिरेकी संघटनेने मतदान केन्द्रावर हल्ला चढवून आपल्या कारवायांची सुरुवात केली.
    1990 : फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने 515.3 किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
    1991 : रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
    1995 : स्थानिक ठिकाणचे  पाच हजार रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
    1998 : पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.
    2009 : श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे 26 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवले.  

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget