(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jobs : 5 नोकऱ्या, ज्यासाठी पदवीची गरज नाही, लाखोंची करु शकता कमाई!
Jobs Update : प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. त्यासाठी प्रत्येकजण तयारीही करतो. चांगली नोकरी मिळवून आपले भविष्य सुरक्षित करावे अशी लोकांची इच्छा आहे.
Jobs Update : प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. त्यासाठी प्रत्येकजण तयारीही करतो. चांगली नोकरी मिळवून आपले भविष्य सुरक्षित करावे अशी लोकांची इच्छा आहे. पण सध्याच्या काळात जगभरातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकांना नोकरीची चिंता सतावत आहे. एकतर आधीच नोकरीच्या संधी कमी होत्या, त्यात कोरोना महामारीने सर्व गणिते बदलली. कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हळुहळू आता परिस्थिती रुळावर येत आहे, पण त्यानंतरही नोकरीच्या संधी फार कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या घडीला एका जागेसाठी हजारो अर्ज येतात. पण एका जॉब एक्सपर्टने काही कामांबद्दल माहिती दिलेय, ज्यातून तुम्ही सहज लाखोंची कमाई करू शकता. त्याबाबत जाणून घेऊयात..
ESS च्या कार्यकारी संचालक कॅथरीन स्टोरेर यांनी पाच प्रोफेशनबद्दल सांगितलेय. त्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही. नोकरी म्हटले की पदवीपर्यंतचं शिक्षण आलेच. पण कॅथरीन यांनी कोणत्याही पदवीशिवाय नोकरीच्या पाच संधी सांगितल्या आहेत. इतकेच नाही, तर त्या नोकरीमधून लाखो रुपयांची कमाईही होणार आहे. शिक्षणावर पैसा खर्च करण्याची गरज नाही, नोकरीसाठी टेन्शन घ्यायचीही गरज नाही. फक्त या पाच व्यवसायात नशीब आजमावा आणि श्रीमंत व्हा.
ESS च्या कार्यकारी संचालक आणि जॉब एक्सपर्ट कॅथरीन स्टोरेर म्हणाल्या की, 'ज्या नोकऱ्यांद्वारे तुम्ही लाखोंची कमाई करू शकता, त्यामध्ये बांधकाम (कंस्ट्रक्शन) आघाडीवर आहे. होय, कंस्ट्रक्शनमध्ये करियर करण्यासाठी तुम्हाला पदवीचीही गरज नाही.' कॅथरीन पदवी नसलेल्या लोकांना नोकरीच्या शोधात मदत करते. तिने सांगितले की, ती अशा लोकांना ट्रेनिंग देते. एकदा ही लोकं शिकले की ते या क्षेत्रात येतात आणि पैसे कमावतात.
कंस्ट्रक्शनशिवाय इक्विपमेंट ऑपरेटर या पोस्टमधूनही बक्कळ पैसा कमावता येतो. इक्विपमेंट ऑपरेटर मध्ये वेगवेगळ्या मशीनचे तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्याची सेफ्टी मेंटेन करावी लागते. सध्या मार्केटमध्ये याची खूप डिमांड अन् लोक कमी आहेत. त्याशिवाय बांधकाम हा व्यवसायही यामध्ये मोडतो. कॅथरीनच्या मते, लोकांना वाटेल की बांधकमा करणे ही कमी पगाराची नोकरी आहे. पण हा लोकांचा गैरसमज आहे. यामध्ये भरपूर पैसा आहे. त्याशिवाय जनरल लेबर,व्यवस्थापन आणि सुपरवायजरच्या नोकऱ्या करून लोक पदवीशिवाय लाखो कमवू शकतात.