एक्स्प्लोर

BMC Recruitment 2024 : सुवर्णसंधी, मुंबई महापालिकेत निरीक्षकपदाची भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत कर निर्धारण आणि संकलन खात्यामध्ये निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मुंबई :  मुंबई महापालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या आस्थापनेवर निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं पात्र उमेदवारांकडून या संदर्भात अर्ज मागवले आहेत. निरीक्षक या पदाच्या 178 जागांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांनी या भरती  प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील दिला जाणार आहे. 

मुंबई महापालिकेनं करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील निरीक्षक या पदाच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले असून परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 29200-92300 या वेतनश्रेणीप्रमाणं पगार मिळणार आहे. 178 पदांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11,अनूसुचित जमाती 3, विमुक्त जाती 3, भटक्या जमाती 4, भज 2, इतर मागास प्रवर्ग 32, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 18, ईडब्ल्यूएस 18 आणि खुल्या प्रवर्गासाठी 87 जागा असतील. 

निरीक्षक पदासाठी कोण अर्ज करणार?

निरीक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावी  किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.  संगणकाचं ज्ञान असल्याबाबतचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यवसायिक प्रमाणपत्र असावे.

मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या निरीक्षक पदाच्या भरतीनुसार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यास एक महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.  19 ऑक्टोबरपर्यंत पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करु शकतात. 

निरीक्षक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनं करणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचं शुल्क 1000 रुपये असेल तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. पुढील काळात निरीक्षक पदाच्या संख्येत वाढ देखील होऊ शकते, असं मुंबई महापालिकेच्या जाहिरातीमध्य म्हटल आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. दरम्यान, अर्ज सादर करताना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.

इतर बातम्या : 

Income Tax Recruitment 2024: आयकर विभागात नोकरी मिळवण्याची नामी संधी; 56 हजारांहून अधिक मिळेल पगार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget