RBI Vacancy 2022 : आरबीआयमध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची आजची शेवटची संधी, त्वरा करा!
Reserve Bank of India Vacancy 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये मोठी भरती. वेळ घालवू नका.
Reserve Bank of India Vacancy 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या 950 जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया 8 मार्च म्हणजेच, आज बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते आता सेंट्रल बँकेच्या वेबसाइट rbi.org.in वर नोंदणी करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या 950 जागा भरण्यासाठी 17 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार अर्ज करण्यासाठी किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
RBI सहाय्यक परीक्षा 2022 वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
RBI सहाय्यक परीक्षा 2022 निवड प्रक्रिया
सहाय्यक पदासाठीची परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. प्राथमिक, मुख्य आणि नंतर भाषा प्राविण्य चाचणी. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेच्या www.rbi.org.in वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
RBI सहाय्यक परीक्षा 2022 तारीख
आरबीआय सहाय्यक पदासाठी ऑनलाइन प्राथमिक परीक्षा 26 आणि 27 मार्च रोजी घेतली जाईल. सध्या या तारखा तात्पुरत्या आहेत. मुख्य परीक्षा मे 2022 मध्ये होणार आहे.
महत्त्वाची माहिती
आरबीआय सहाय्यक परीक्षा अर्ज भरण्यात कोणतीही अडचण आल्यास, उमेदवारांच्या तक्रारी निवारण कक्षाकडे cgrs.ibps.in वर चौकशी केली जाऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bank of Baroda Vacancy 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती, लगेचच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया
- Job Majha : SBI SCO Recruitment 2022 : एसबीआयमध्ये नोकरीची संधी, सर्व माहिती एका क्लिकवर
- Job Majha : बँकमध्ये जॉब शोधताय, बँक ऑफ बडोदामध्ये आहे नोकरीची संधी, वाचा डिटेल्स
- Recruitment in FSSAI : प्रति माह 60 हजार वेतन मिळवण्याची संधी; FSSAI मध्ये भरती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha