Recruitment in FSSAI : प्रति माह 60 हजार वेतन मिळवण्याची संधी; FSSAI मध्ये भरती
Recruitment in FSSAI : प्रति माह 60 हजार वेतन मिळवण्याची संधी. वेळ दवडू नका. FSSAI मध्ये भरतीसाठी अर्ज करा.

Recruitment in FSSAI : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न विश्लेषक पदासाठी भरती काढली आहे. या पदासाठी पात्र असलेले उमेदवार 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2022 आहे. त्यानंतर कोणताही अर्ज (Application Form) स्वीकारला जाणार नाही. ही भरती FSSAI मध्ये अल्प मुदतीच्या कराराच्या आधारावर केली जात आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
वेतन
एफएसएसएआयच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 60 हजार रुपये वेतन दिलं जाईल. यासोबतच उमेदवारांची कामाची मर्यादा 6 महिन्यांसाठी असेल. परंतु कामाचं कौशल्य आणि आवश्यकतेनुसार कार्यकाळ एक वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार लेखी चाचणी आणि मुलाखत प्रक्रियेवर आधारित असतील. त्याच वेळी, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अर्जदारांना अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट द्यावी लागेल.
अन्न विश्लेषक पदासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
अन्न विश्लेषक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर भेट द्यावी लागेल. नंतर @FSSA वर जा. आता Food Analyst (On Contract basis) at National Food Laboratory, JNPT, Nhava Sheva, Mumbai – Advt No. Cont‐01/2022’ यावर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा. आता आपला अर्ज भरा आणि सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा. फॉर्म डाऊनलोड करा आणि प्रिटआऊट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
