Job Majha: पुणे मेट्रो, मुंबई पोर्ट आणि ONGC मध्ये भरती सुरू; असा करा अर्ज
Job Majha: पुणे मेट्रो रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि ONGC मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पुणे मेट्रो रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि ONGC मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. साठी काय पात्रता आहे, अर्ज कसा करायचा यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
पुणे मेट्रो रेल्वे
विविध पदांसाठी ही भरती होत आहे.
पोस्ट - मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी
एकूण जागा – 40
शैक्षणिक पात्रता – CA आणि पदवीधर (विस्ताराने महत्वाची माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
नोकरीचं ठिकाण – पुणे
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - www.punemetrorail.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मुंबई पोर्ट ट्रस्ट
एकूण 5 जागांसाठी ही भरती होत आहे.
पहिली पोस्ट - उपमुख्य यांत्रिक अभियंता ( Deputy Chief Mechanical Engineer)
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता - यांत्रिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य, 12 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.
दुसरी पोस्ट - वरिष्ठ उपव्यवस्थापक (senior deputy manager)
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि 12 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – 42 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. त्यात advertisement वर क्लिक करा. दोन्ही पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची वेगवेगळी लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
ONGC, मुंबई
पोस्ट – फिल्ड मेडिकल ऑफीसर, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, जनरल सर्जन
एकूण जागा – 22
शैणक्षिक पात्रता – फिल्ड मेडिकल ऑफीसर पदासाठी MBBS, फिजिशियनसाठी MD जनरल मेडिसीन, जनरल सर्जन पदासाठी MS जनरल सर्जरी, बालरोगज्ज्ञसाठी MD (पेडिएट्रिक्स)
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - www.ongcindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये recruitment notices वर क्लिक करा. वर्ष 2022 वर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टंसदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या: