Passport Office Recruitment 2022 : पासपोर्ट ऑफिसमध्ये भरती, दोन लाखांहून अधिक पगार, पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
Passport Office Recruitment 2022 : भारत सरकारने पासपोर्ट अधिकारी आणि सहाय्यक पासपोर्ट अधिकारी या पदांसाठी रिक्त पदे प्रसिद्ध केली आहेत. इच्छुक उमेदवार 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.
Passport Office Recruitment 2022 : केंद्रीय पासपोर्ट संघटना, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून भारत सरकारच्या पासपोर्ट कार्यालयातील भरती जाहीर केली आहे. याभरती अंतर्गत पासपोर्ट अधिकारी आणि सहायक पासपोर्ट अधिकारी या पदांवर भरती (Passport Office Recruitment 2022) करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार passportindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2022 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. या भरती प्रक्रियेअंतर्गत 24 पदांवर भरती केली जाणार आहे.
भरतीप्रक्रिये संदर्भातील महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2022
रिक्त जागांचा तपशील
एकूण रिक्त पदांची संख्या : 24
शैक्षणिक पात्रता
पासपोर्ट ऑफिसरसाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. पालक संवर्ग किंवा विभागात किंवा तत्सम पदावर पाच वर्षांच्या सेवेसह नियमितपणे नियुक्त केलेला असावा. याशिवाय उमेदवाराला नऊ वर्षांचा अनुभव असावा. सहायक पासपोर्ट ऑफिसरसाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. पालक संवर्ग किंवा विभागात किंवा संबंधित पदावर पाच वर्षांच्या सेवेसह नियमितपणे नियुक्त केलेला असावा. याशिवाय उमेदवाराला एकूण पाच वर्षांचा अनुभव असावा.
पगाराचा तपशील
पासपोर्ट ऑफिसर पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 78 हजार 800 रुपये ते 2 लाख 09 हजार 200 रुपये प्रति महिना पगार मिळेल. तर सहाय्यक पासपोर्ट अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 67 हजार 700 रुपये ते 2 लाख 08 हजार 700 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या