Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये 421 पदांसाठी बंपर भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी
Oil India Job Vacancy 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) 421 वर्कपर्सन रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.
Oil India Limited Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India Limited Job) बंपर भरती करण्यात येत आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने वर्कपर्सन पदांच्या 421 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑईल इंडियाने अधिकृत अधिसूचना जारी करत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑईल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
Oil India Limited Workpersons Recruitment 2024 : अर्ज करण्याची शेवटची संधी
ऑईल इंडिया लिमिटेडमधील या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणारे कामगार उमेदवार IOL अधिकृत वेबसाइट oil-india.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा या बातमीत दिलेल्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करून त्वरित अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची आज म्हणजे 30 जानेवारी शेवटची तारीख आहे.
Oil India Limited Workpersons Recruitment 2024 : पात्रता आणि निकष
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी पदानुसार 10+2 (मध्यवर्ती)/ ट्रेड सर्टिफिकेट/ पदवी/ डिप्लोमा प्राप्त केलेला असावा.
Oil India Limited Workpersons Vacancy 2024 : वयोमर्यादा
यासोबतच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. पदानुसार कमाल वय 33/36/38 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी. उमेदवारांचे वय 30 जानेवारी 2024 पर्यंत मोजलं जाईल.
Oil India Limited Workpersons Job 2024 : अर्ज कसा करायचा?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवार फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑइल इंडिया कामगार भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा.
Oil India Limited Workpersons Job 2024 : अर्ज शुल्क
ऑइल इंडिया कामगार भरती 2024 साठी अर्जासोबत तुम्हाला अर्जाची फी जमा करावी लागेल, त्यानंतरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी भरतीसाठी 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, EWS, दिव्यांग, माजी सैनिक या उमेदवारांना भरती अर्जात सवलत देण्यात आली असून हे उमेदवार विनामूल्य अर्ज दाखल करु शकतात.
Oil India Limited Workpersons Job 2024 : निवड कशी केली जाईल?
या भरतीअंतर्गत निवड होण्यासाठी उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल. अंतिम गुणवत्ता यादी फक्त सीबीटी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी एकदा अधिकृत अधिसूचना नीट वाचून घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :