NHAI Recruitment 2024 : इंजिनीअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी, विना परीक्षा निवड आणि 2 लाखांपर्यंत पगार
NHAI Jobs 2024 : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे.
NHAI Jobs 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. इंजिनीअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी असून विना परीक्षा निवड आणि 2 लाखांपर्यंत पगार मिळवण्याची संधी आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ही बातमी सविस्तर वाचा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या भरतीअंतर्गत उमेदवारांच्या अर्जाची छाटणी केली जाईल, त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल आणि त्यानंतर त्यांची निवड केली जाईल.
NHAI Recruitment 2024 : रिक्त जागा तपशील
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ४९ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि व्यवस्थापक (तांत्रिक) यांची आहेत. निवड झाल्यावर, उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही पोस्ट केले जाऊ शकते. यापैकी २७ पदे उपव्यवस्थापकाची तर २२ पदे व्यवस्थापकाची आहेत.
NHAI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून BE/B.Tech केलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही असणं गरजेचं आहे.
NHAI Recruitment 2024 : वयोमर्यादा
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती मोहिमेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. या भरतीसंदर्भात अधिक नियम आणि तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली अधिसूचना तपासा.
NHAI Recruitment 2024 : येथे दाखल करा अर्ज
NHAI च्या या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. हे करण्यासाठी, तुम्हाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, ज्याचा पत्ता आहे – nhai.gov.in. येथूनही तपशील जाणून घेता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.
NHAI Recruitment 2024 : निवड कशी होणार, पगार किती?
या भरतीसाठी पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेवर आधारित शॉर्टलिस्टिंग, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची केली जाईल.
NHAI Recruitment 2024 : किती पगार मिळेल?
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना, डेप्युटी मॅनेजर पदासाठी वेतन लेव्हल 12 म्हणजे 78 हजार ते 2 लाख 10 हजार रुपये आहे. तर व्यवस्थापक पदासाठी, स्तर 11 नुसार वेतन रुपये 67 हजार ते 2 लाख 8 हजार रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :