(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NFR Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5000 हून अधिक पदांवर बंपर, जाणून घ्या अर्ज कुठे आणि कसा कराल?
NFR Railway Recruitment 2022 : या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असावे.
NFR Railway Recruitment 2022 : सरकारी नोकरीची करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वे भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने (NFR Railway) अप्रेंटिसच्या म्हणजेच शिकाऊ पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या nfr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीबाबत संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या.
पाच हजारहून अधिक पदं रिक्त
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने जाहीर केलेल्या शिकाऊ भरतीअंतर्गत एकूण रिक्त 5636 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
विभाग आणि कार्यशाळानिहाय रिक्त जागा तपशील
- कटिहार (KIR) आणि TDH कार्यशाळेसाठी पदांची संख्या - 919 पदं
- अलीपुरद्वार (APDJ) साठी पदांची संख्या - 522 पदं
- रंगिया (RNY) साठी रिक्त जागांची संख्या 551 पदं
- लुमडिंग (LMG), S&T / कार्यशाळा / MLG (PNO) आणि ट्रॅक मशीन / MLG - 1140 पदं
- तिनसुकिया येथील रिक्त पदांची संख्या - 547 पदं
- न्यू बोंगाईगाव वर्कशॉप (NBQS) आणि EWS/BNGN - 1110 पदं
- दिब्रुगड कार्यशाळेसाठी (DBWS) पदांची संख्या - 847 पदं
या तारखेपर्यंत अर्ज पूर्ण करा
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in वर अर्ज भरावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 रात्री 10 वाजेपर्यंत आहे. कोणतीही तांत्रिक समस्या टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरणं आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे. इच्छुक अर्जदाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी देखील असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांची वय 15 वर्षांपेक्षा जास्त (1 एप्रिल 2022 पर्यंत) आणि 24 वर्षांपेक्षा कमी (1 एप्रिल 2022 पर्यंत) असावे.
अर्जाचे शुल्क
अर्जदारांना या भरतीसाठी अर्ज करताना 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.
अर्ज कसा करावा?
- उमेदवारानं अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in ला जावं.
- होम पेजवर दिसणार्या संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
- आतावश्यक लॉगिन करून स्वतःची नोंदणी करा.
- आता आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरा.
- त्यानंतर अर्जाची फी भरा आणि सबमिट करा.