एक्स्प्लोर

MPSC Exam : PSI, कर सहायक ते लिपीक टंकलेखक पदांची भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध, 1815 जागा भरणार

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट ब आणि गट क मधील 1815 जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) अखेर गट ब आणि गट ब सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. गट कच्या 1333  आणि गट बच्या 482 जागा भरल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहिरात प्रसिद्ध केल्यानं  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसभा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 

गट क  सेवेतून कोणत्या जागा भरल्या जाणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल त्यांच्या वेबसाईटवर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट  क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे 1333 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक ,बेलिफ लिपीक, गट क नगरपाल  मुंबई, लिपिक टंकलेखक या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

उद्योग निरीक्षक 39 जागा, कर सहायक 482 जागा, तांत्रिक सहायक 09 जागा, बेलिफ लिपीक, गट क नगरपाल  मुंबई  17 जागा, लिपिक टंकलेखकच्या 786 जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. गट कची परीक्षा 2 फेब्रुवारी  रोजी आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचीसाठी 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरचा वेळ देण्यात आला आहे.  

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवा भरतीसह  गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे गट ब मधील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदं भरली जाणार आहेत. सहायक कक्ष अधिकारी  गट ब अराजपत्रित  54 जागा, राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित 209 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक 216 जागा भरल्या जाणार आहेत. 

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा परीक्षा 5 जानेवारीला आयोजित करण्यात येणार आहे. गट ब मधील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येतील. 

परीक्षा शुल्क किती ? 

महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 294 रुपये फी भरावी लागेल. महाराष्ट्र गट ब  सेवा  अराजपत्रित मधील पदांसाठी परीक्षा शुल्क देखील सारखंच असेल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. 

इतर बातम्या : 

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार, वर्षभरात 10 हजार जागांची भरती, बँक 600 नव्या शाखा उघडणार

CDCC Bank Recruitment : चंद्रपूर जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया सुरु, लिपीक अन् शिपाई पदाच्या 358 जागांवर भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget