एक्स्प्लोर

Job Majha : रिझर्व्ह बँक, मेल मोटर सर्विस आणि उल्हासनगर महापालिकेत भरती सुरू, असा करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका, भारतीय रिझर्व्ह बँक आणि मेल मोटर सर्विस, मुंबई या ठिकाणी भरती सुरू आहे. 

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

उल्हासनगर महानगरपालिका, भारतीय रिझर्व्ह बँक आणि मेल मोटर सर्विस, मुंबई या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

उल्हासनगर महानगरपालिका

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम (कंत्राटी स्वरुपात ही भरती आहे.)

शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS MCI/ MMC, फार्मासिस्ट पदासाठी D.Pharma/ B.Pharma, स्टाफ नर्स पदासाठी GNM/B.Sc., लॅब टेक्निशियनसाठी B.Sc MLT, ANM साठी ANM कोर्स उत्तीर्ण ही पात्रता हवी.

एकूण जागा – 37 (यात वैद्यकीय अधिकारी पदासाठी 6 जागा, फार्मासिस्ट पदासाठी 2 जागा, स्टाफ नर्ससाठी 1 जागा, लॅब टेक्निशियनसाठी 5 जागा, ANM साठी 23 जागा आहेत. )

नोकरीचं ठिकाण- उल्हासनगर, ठाणे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला,  उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर -3

लक्षात घ्या वैद्यकीय अधिकारी पदासाठीची मुलाखत 29 एप्रिलला होणार आहे.

मुलाखतीचं ठिकाण - अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख– यात वैद्यकीय अधिकारी पदासाठी 29 एप्रिल आणि इतर पोस्टसाठी 29 एप्रिल शेवटची तारीख आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

तपशील - www.umc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर news & notices मध्ये उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरणेबाबत. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भारतीय रिझर्व्ह बँक

पोस्ट – वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता – MBBS

एकूण जागा – 14

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022

तपशील - www.rbi.org.in (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये recruitment related announcements वर क्लिक करा. Current vacancies मध्ये vacancies वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मेल मोटर सर्विस, मुंबई

एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - मेकॅनिक (मोटर व्हेईकल)

शैक्षणिक पात्रता - संबंधित ITI किंवा 8 वी उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव, अवजड वाहन चालक परवाना  

एकूण जागा – 5

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील - www.indiapost.gov.in

पोस्ट – इलेक्ट्रिशियन, टायरमन, ब्लॅकस्मिथ

शैक्षणिक पात्रता - संबंधित ITI किंवा 8वी उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा – 4 (यात इलेक्ट्रिशिनसाठी 2 जागा आणि टायरमन, ब्लॅकस्मिथसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता-  The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील - www.indiapost.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. 25 मार्चच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP MajhaRaigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दीMantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवालMumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Embed widget