Job Majha : पदवीधरांसाठी उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 223 जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती
Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तसेच आरोग्य विभागा अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेची माहिती.
![Job Majha : पदवीधरांसाठी उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 223 जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती Job Majha Recruitment of 223 posts under Maharashtra State Power Transmission Company Job Majha : पदवीधरांसाठी उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 223 जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/6e961a26fe39af1becefeda1b109098a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : कोरोना महामारीनंतर अनेकजण नोकरी शोधण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांना जॉबची गरज आहे. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
>>महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी<<
पहिली पोस्ट - सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)
शैक्षणिक पात्रता - सहाय्यक अभियंता या पदासाठी जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी असणे गरजेचे आहे.
एकूण जागा - 170
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मे 2022
तपशील - www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
दुसरी पोस्ट - सहाय्यक अभियंता (टेलिकॉम)
शैक्षणिक पात्रता - सहाय्यक अभियंता (टेलिकॉम) या पदासाठी शैक्षणिक पात्रता साधारण B.E / B.Tech (इलेक्टॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन) ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.
एकूण जागा - 25
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मे 2022
तपशील - www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
तिसरी पोस्ट - सहाय्यक अभियंता (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा - 28
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मे 2022
तपशील - www.mahatransco.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या ताज्या बातम्या आणि अद्यतने यात 4 मे 2022 ला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पोस्ट - आरोग्य सेविका (ANM)
शैक्षणिक पात्रता - ANM कोर्स
एकूण जागा - 88
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण - पिंपरी चिंचवड
मुलाखतीचा पत्ता - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
या पदासाठी थेट मुलाखत ही दिनांक 17, 18 आणि 19 मे 2022 रोजी होणार आहे.
तपशील - www.pcmcindia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग
पोस्ट - अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता - शासन सेवेतील पाणी पुरवठ्याच्या कामाशी संबंधित समकक्ष पदांचे दीर्घ अनुभव.
एकूण जागा - 20 (यात अधीक्षक अभियंता पदासाठी 1 जागा, कार्यकारी अभियंता पदासाठी 1 जागा, उपअभियंता स्थापत्य पदासाठी 9 जागा, सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता 9 जागा आहेत.
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
मुलाखतीचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ महानगरपालिका औरंगाबाद
मुलाखतीची तारीख - 10 मे 2022
तपशील - www.aurangabadmahapalika.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)