(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, जिल्हा रुग्णालय धुळे आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी अष्टा येथे विविध पदांसाठी भरती
Job Majha : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, जिल्हा रुग्णालय धुळे आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी अष्टा येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
Job Majha : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता. जिल्हा रुग्णालय धुळे येथीही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरतीसाठी थेट मुलाखतीतून निवड होणार आहे. याबरोबरच सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी येथेही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या जागांसाठीही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद ( Government Medical College Aurangabad )
पोस्ट : वरिष्ठ निवासी डॉक्टर
शैक्षणिक पात्रता : MD/MS/DNB
एकूण जागा : 86
नोकरीचं ठिकाण : औरंगाबाद
ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : aurangabad.gov.in
जिल्हा रुग्णालय धुळे ( District Hospital Dhule )
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS, BAMS
एकूण जागा : 25
वयोमर्यादा : 58 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : धुळे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023
थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख : 1 मार्च 2023
मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे
अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in
अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी-फार्मसी अष्टा- सांगली ( Annasaheb Dange College of B Pharmacy Ashta )
पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
एकूण जागा : 26
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी.फार्मसी, अष्टा, ता. वाळवा, जि. सांगली.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.adcbp.in
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
महत्वाच्या बातम्या