(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : IBPS, महापारेषण आणि ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी! 'असा' करा अर्ज
Job Majha : IBPS, महापारेषण, (सोलापूर), एसटी महामंडळ (लातूर), समर्थ सहकारी बँक लि. (सोलापूर) या ठिकाणी भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. IBPS, महापारेषण, (सोलापूर), एसटी महामंडळ (लातूर), समर्थ सहकारी बँक लि. (सोलापूर) या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या
IBPS मध्ये विविध पदांच्या 710 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - आयटी अधिकारी (स्केल- I), कृषी अधिकारी (स्केल - I), मार्केटिंग ऑफिस (स्केल- I), कायदा अधिकारी (स्केल- I), एचआर/ पर्सनल ऑफिसर (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I)
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, पदवीधर
एकूण जागा - 710
वयोमर्यादा - 20 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022
तपशील - www.ibps.in
--------------------------------------
महापारेषण, सोलापूर
पोस्ट - अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता - 10वी पास, ITI
एकूण जागा - 63
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 20 नोव्हेंबर 2022
तपशील - mahatransco.in
--------------------------------------
एसटी महामंडळ, लातूर
पोस्ट - अप्रेंटिस (यात वेल्डर, शीट मेटल वर्कर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक यांचा समावेश आहे.)
शैक्षणिक पात्रता - वेल्डर, शीट मेटल वर्कर, पेंटरसाठी 8 वी पास, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकसाठी 10 वी पास ही पात्रता हवी.
एकूण जागा - 39
नोकरीचं ठिकाण - लातूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
3 नोव्हेंबरपासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईट - www.apprenticeshipindia.gov.in
---------------------------------------------------------
समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर
पोस्ट - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता - सहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदासाठी पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MS-CIT, शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक) पदासाठी १०वी किंवा १२वी पास
एकूण जागा - 38
वयोमर्यादा - 30 वर्ष
नोकरीचं ठिकाण - सोलापूर
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - hr@samarthbank.com
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2022
तपशील - www.samarthbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली माहिती मिळेल.)